भारताने आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup)सलग दोन सामने जिंकत उत्तम सुरूवात केली, मात्र एका खेळाडूचा फॉर्म संघाची चिंता वाढवत आहे. भारताचा सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल याला अजूनही फॉर्म गवसायचा आहे. तो मागील काही सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 धावा केल्या होत्या. नेदरलॅंड्सविरुद्ध तरी उत्तम खेळेल अशी अपेक्षा असताना तो अवघ्या 9 धावांवर बाद झाला. यामुळे तो सध्या चाहत्यांचा टिकांचा निशाना बनला आहे. यावर उपाय म्हणून त्याने भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली याचा मार्ग अवलंबण्याचा विचार केला.
केएल राहुल (KL Rahul) याने ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात उत्तम कामगिरी केली होती, मात्र मुख्य सामन्यांमध्ये तो गडबडला. अशीच स्थिती दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होऊ नये यासाठी त्याने मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन (Paddy Upton) यांची मदत घेतली. एका वृत्त माध्यमाच्या रिपोर्ट्सनुसार, राहुलने अप्टन आणि कोचिंग स्टाफसोबत खास ट्रेनिंग केली.
अप्टन यांनी विराट कोहली (Virat Kohli) यालाही त्याच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली होती. त्याच्या मार्ग स्विकारत आता राहुलही अप्टन यांच्यासोबत खास सराव सत्रात खेळत आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना वाटते की राहुल संघात परतल्यापासून त्याला टेक्निकल नाही तर मानसिक अडचण आहे. राहुलसाठी पुढील दोन दिवस एक ते दोन तास अप्टन यांच्यासोबत सत्र ठेवले गेले.
अप्टन हे भारतासोबत नुकतेच काही काळासाठी जोडले गेले आहेत. ते 2011मध्येही भारताच्या विश्वचषकाच्या सहकोचिंग स्टाफमध्ये (बॅकरूम) होते. आशिया चषकाच्या आधी विराट आऊट ऑफ फॉर्म होता, तेव्हा अप्टन यांनीच त्याला मदत केली होती. त्यांनी विराटसोबत खास सराव सत्र केले होते. त्याचे परिणाम आपल्याला दिसतच आहेत. त्याने विश्वचषकाच्या सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. यामुळे राहुलही लवकरच फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…