भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल याच्यासाठी सध्या कठीण काळ सुरू आहे. मागील काही काळापासून तो दुखापतींशी झुंज देत आहे. नुकताच तो दुखापतीतून सावरल्याची बातमी आली होती. मात्र, ही बातमी येऊन २४ तास उलटण्याआधीच तो कोरोनाबाधित नवी बातमी माध्यमांमध्ये आली आहे.
दुखापतीतून सावरतोय राहुल
इंडियन प्रीमियर लीगनंतर भारतीय क्रिकेट संघाने तीन मालिका खेळल्या आहेत. जून महिन्यात खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी२० मालिकेत त्याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले गेलेले. मात्र, तो दुखापतीमुळे त्या मालिकेला मुकला. तो उपचारासाठी जर्मनीला पोहोचला होता. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये आहे. येथे भारतीय संघ तीन वनडे व पाच टी२० सामने खेळेल. या दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, दुखापतीतून सावरल्यानंतरच त्याला संघात सामील होता येणार होते. त्याचीही तंदुरुस्त चाचणी सकारात्मक आलेली.
Senior batter KL Rahul @klrahul has tested positive for #COVID19: @BCCI president @SGanguly99 told reporters after Apex Council Meeting.#CricketTwitter
— Kushan Sarkar (@kushansarkar) July 21, 2022
तंदुरुस्ती सिद्ध केली असली तरी, राहुल आता वेस्ट इंडीजमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. कारण, तो नुकताच कोविड पॉझिटिव्ह झाल्याची बातमी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. बीसीसीआयच्या वार्षिक सभेनंतर बोलताना त्यांनी याबाबत उलगडा केला. भारताचा वेस्ट इंडीज दौरा २२ जूलै ते ७ ऑगस्ट या काळात होणार आहे. यातील बराचसा काळ राहुलला बरा होण्यासाठी लागू शकतो.
झिम्बाब्वेविरूद्ध करू शकतो नेतृत्व
या सर्व परिस्थितीत राहुलचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून होऊ शकते. भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. राहुलने अखेरच्या वेळी स्पर्धात्मक क्रिकेट आयपीएलमध्ये मे महिन्यात खेळले होते. त्याच्या नेतृत्वातील लखनऊ सुपरजायंट्स संघ प्ले ऑफपर्यंत पोहोचला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?
‘…तर मी भारताविरुद्ध खेळलायला घाबरलो असतो’, विराट कोहलीविषयी रिकी पाँटींगचे मोठे विधान
भारताच्या ‘या’ खेळाडूवर वेस्ट इंडीज दौऱ्यात असेल सर्वांचे लक्ष, प्रज्ञान ओझावरही पाडलाय प्रभाव