भारतीय संघाला आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक सामने जिंकून देणारा एस श्रीसंत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलबद्दल मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, राहुल तो खेळाडू आहे जो विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकतो. तसेच तो पुढे म्हणाला की, राहुलकडे ते सर्व आहे जे एका खेळाडूला कर्णधार (Captain) होण्यासाठी आवश्यक आहे.
श्रीसंत (S Sreesanth) राहुलबद्दल बोलताना पुढे म्हणाला की, “केएल राहुल तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करत आहे. त्याला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले तरी ती जबाबदारी राहुल चांगल्याप्रकारे पार पाडतो. राहुलने स्वत:साठी नाहीतर संघासाठी खेळतो. तो विराटप्रमाणेच मेहनत घेतो.”
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला होता की, भारतीय संस्कृती बदलली आहे. ज्याप्रकारे पूर्वी ज्यूनियर खेळाडू अनुभवी किंवा सिनीयर खेळाडूंचा आदर करत होते, तसे आता होत नाही.
युवराजच्या या मुद्द्यावर हॅलो लाईव्ह चॅटदरम्यान पत्रकार विमल कुमारने श्रीसंतला त्याचे मत विचारले होते. यावर तो म्हणाला की, “पूर्वी आणि आतामध्ये फरक आहे. आता खेळाडूंकडे आयपीएलसारख्या अनेक संधी आहेत. पूर्वी असे नव्हते. जर मी आताच्या खेळाडूंप्रमाणे विचार करत असेल तर ते योग्य आहेत. सध्या मी केरळ रणजी संघाबरोबर जोडलो गेलो आहे. तसेच मला तिथे खूप आदर मिळत आहे.”
याव्यतिरिक्त श्रीसंतने विराटची आक्रमकताही योग्य असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, विराटची विचारसरणी योग्य आहे. श्रीसंत म्हणाला की, “सचिन आणि विराटची तुलना होऊ शकत नाही. दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. दोघांची आपली वेगळी स्टाईल आहे. विराट क्रिकेटचा राजा आहे तर सचिन क्रिकेटचा देव आहे.”
श्रीसंतने पुढे असेही सांगितले की, सध्याच्या काळात त्रिशतक ठोकण्याची क्षमता विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या खेळाडूंमध्ये आहे. तसेच त्याने इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला (Ben Stokes) त्रिशतक ठोकण्याचा दावेदार असल्याचेही सांगितले आहे.
याव्यतिरिक्त श्रीसंतने भारतीय गोलंदाजीचीही प्रशंसा केली. तो म्हणाला की, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. याबरोबरच हे दोन्ही खेळाडू दमदार होत आहेत. यामुळेच तो म्हणाला की, सध्याच्या काळात भारतीय संघाला कसोटी सामन्यांमध्ये कोणीही पराभूत करू शकत नाही. तरीही काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ०-२ने पराभव स्विकारावा लागला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ड्रीम ११: लग्न न झालेल्या क्रिकेटपटूंची टीम इंडिया
-आम्हाला भारताला भारतात कसोटीत करायचे आहे पराभूत
-Covid 19- लाॅकडाऊनमुळे २ महिने भारतात अडकलेले खेळाडू मायदेशी परतणार, खास विमानाने केली सोय