fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आधे मधे काही नाही, चाहत्याने थेट टीम इंडियाच्या कर्णधाराकडे मागितला नेटफ्लिक्सचा आयडी-पासवर्ड, खेळाडूनेही…

Here's someone who has priorities straight and it's really making me want to consider the demand

जवळपास सर्वच खेळाडू सोशल मीडिया माध्यमांचा वापर करतात. अशामध्ये काही वेळा खेळाडूंना चाहत्यांचे अनेक प्रकारचे मेसेजेस येतात. अशाच प्रकारचा एक मेसेज भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला आला होता.

यावेळी चाहत्याने सुनीलकडे (Sunil Chhetri) त्याच्या नेटफ्लिक्स अकाऊंटचा आयडी आणि पासवर्डची मागणी केली होती. तसेच त्याने पुढे लिहिले होते की, लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलून घ्या.

या मेसेजचा स्क्रीनशॉट सुनीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरू शेअर केला आहे.

हा स्क्रीनशॉट शेअर करत सुनीलने ट्वीट केले की, “जर्सी नको, फोटोवर ऑटोग्राफ नको, पोस्टवर रिप्लाय नको आणि शेजारच्या मुलाच्या पाळीव कुत्र्याची इच्छा बाळगणारा व्हिडिओही नको. परंतु येथे अशी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा प्राधान्यक्रम अगदी सरळ आहे आणि तो मला त्याची मागणी विचार करण्यास मला खरोखर भाग पाडत आहे.”

सुनीलच्या या ट्वीटवर भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने (Saina Nehwal) देखील कमेंट केली आहे. यामध्ये तिने हसणाऱ्या २ ईमोजींचा वापर केला आहे.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) भारतात लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. अशामध्ये काही क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये (Lockdown) वेळ घालवण्यासाठी खेळाडूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. अनेक खेळाडू चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-२०११ विश्वचषक विजयी संघातील खेळाडू म्हणतो, केएल राहुल होणार टीम इंडियाचा कर्णधार

-जगातील ह्या ५ खेळाडूंच्या आहेत विचित्र क्रमांकाच्या जर्सी

-वनडेत एका डावात १६पेक्षा जास्त षटकार मारणारे ४ खेळाडू

 

You might also like