भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुरू असलेल्या चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने शानदार शतक झळकावले. अपघातानंतर जवळपास 2 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पंतने 128 चेंडूत 109 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार मारले. पण यादरम्यान कॅमेऱ्यात एक मजेशीर प्रसंग कैद झाला, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
खर तर, शाकिब-अल-हसनच्या चेंडूवर कर्णधार नजमुल हसन शांतोकडे पंतचा सोपा झेल घेण्याची संधी होती. परंतु त्याने ही सुवर्णसधी हातून दवडली. याचवेळी फलंदाज केएल राहुलची फजिती झाली.
केएल राहुल खुर्चीवरून उठला, पण…
ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील 49व्या षटकात घडली. या षटकाच्या सहाव्या चेंडूवर पंतने स्लॉग स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण शॉट चुकीचा ठरला, त्यामुळे चेंडू बराच वेळ हवेतच राहिला. मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत असलेला नझमुल हसन शांतो झेल घेईल असे सर्वांना वाटत होते. त्याचमुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बसलेला पुढचा फलंदाज, केएल राहुल पंतच्या जागी क्रिजवर येण्यासाठी खुर्चीवरून उठला. पण नझमुल हसन शांतोचा झेल सुटला. परिणामी केएल राहुल परत आपल्या खुर्चीवर बसला.
— Kirkit Expert (@expert42983) September 21, 2024
मोहम्मद सिराजला आपले हसू आवरता आले नाही
हे सर्व पाहून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केएल राहुलच्या शेजारी बसलेला मोहम्मद सिराज कसा तोंड दाबून हसतोय हे दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंत बाद झाल्यानंतर केएल राहुल फलंदाजीला आला. आपल्या खेळीदरम्यान त्याने काही आकर्षक शॉट्स खेळले. परंतु कर्णधार रोहितने 287 धावांवर डाव घोषित केल्याने केएल राहुल 19 चेंडूत 22 धावा करून नाबाद परतला.
हेही वाचा –
राशिद खानची वाढदिवशी मोठी कामगिरी! वनडे क्रिकेटमध्ये असं प्रथमच घडलं
मस्ती नाही थांबली पाहिजे..! कसोटी सामन्यादरम्यान विराटची पंच रिचर्डसोबत मस्ती- Video
भारत विजयापासून 6 विकेट दूर, बांगलादेशला चमत्काराची आवश्यकता; तिसऱ्या दिवसाचा हाल जाणून घ्या