भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कॅनबेरा येथे झाला. भारतीय संघाने १३ धावांनी विजय मिळवत, मालिकेतील पहिला विजय साजरा केला. पहिल्या दोन सामन्यात आपल्या फलंदाजीने चर्चेत राहिलेला भारताचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक केएल राहुल तिसऱ्या सामन्यातही चर्चेत राहिला. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेत राहण्याचे कारण निराळे होते.
वेगवेगळे बूट घालून राहुल उतरला मैदानात
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०२ धावा उभारल्या. दुसऱ्या डावात जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी आला, तेव्हा भारताचा यष्टीरक्षक केएल राहुल दोन वेगवेगळे बूट घातलेला दिसून आला. त्याची ही फॅशन प्रेक्षकांना मात्र आवडली नाही. त्याच्या या वेगवेगळ्या बूट घालण्याच्या पद्धतीवरून त्याला ट्विटरवर जोरदार ट्रोल करण्यात आले.
चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल
एका चाहत्याने ट्विट करत म्हटले, ‘याला कोणीतरी बूट द्या रे. हा वेगवेगळे बूट घालून आलाय.’
https://twitter.com/Kumarsiddhdev1/status/1334062411226091522
अन्य एका चाहत्याने म्हटले, ‘राहुल वेगवेगळे बूट घालून मैदानात आलाय. पांढऱ्या रंगाचा बूट कसोटीची तयारी दिसतेय.’
KL Rahul wearing two different colour shoes, white one for preparing for Test matches. 👀 pic.twitter.com/LTJgtNWKBf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 2, 2020
एका चाहत्याने कसोटी क्रिकेटला सर्वश्रेष्ठ ठरवताना म्हटले, ‘तुम्ही मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असला, तरी कसोटी क्रिकेट हेच सर्वोत्तम क्रिकेट असल्याचे जाणता.’
When you are playing limited overs cricket but still know Test is the best. #AUSvIND #KLRahul pic.twitter.com/9jRBYhRZe6
— Rohan A. Sawant (@iamrohansawant) December 2, 2020
एका चाहत्याने तर याने आंद्रे रसलकडून प्रेरणा घेतल्याचे म्हटले आहे. त्या चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘मला वाटते आंद्रे रसेलने आयपीएलमधून ही फॅशन सुरू केली आहे. आज राहुलने ती फॅशन पुढे नेली.’
I think Andre Russell brought the fashion of two different shoes in #IPL. #KLRahul is wearing two different shoes today.#AUSvIND
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) December 2, 2020
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी पराभूत केले. मात्र, पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी करणारा केएल राहुल या सामन्यात अपयशी ठरला. त्याने फक्त ५ धावा काढल्या. वनडे मालिकेनंतर भारतीय संघ ४ डिसेंबरपासून टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी
ट्रेंडिंग लेख-
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव
रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी लागू शकते ‘या’ तीन दिग्गजांची वर्णी
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या