भारतीय संघाचा (team india) उपकर्णधार केएल राहुल (kl rahul) वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अनुपस्थित असेल. वेस्ट इंडीजविरुद्धची ही मायदेशातील एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुल अनुपस्थित असला, तरी पुढच्या दोन्ही सामन्यांसाठी तो उपस्थित असेल. पहिल्या सामन्यातील राहुलच्या अनुपस्थितीविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली होती. भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अनुपस्थित असल्यामुळे राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. असे सांगितले जात होते की, दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर कामाच्या तानातून विश्रांती घेण्यासाठी राहुल वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अनुपस्थित असेल. परंतु माध्यमांतील वृत्तानुसार राहुल त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाहीय.
इएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, केएल राहुल त्याच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेला आहे. याच कारणास्तव तो पहिल्या एकदिवसीय सामन्यात अनुपस्थित असेल. लग्न उरकून राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपस्थित राहील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतही राहुल उपस्थित असेल.
https://www.instagram.com/p/CWGcLUXMVaN/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचे खेळाडू शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सपोर्ट स्टाफमधील ४ सदस्यांनाही कोरोना झाल्याची माहिती आहे. तत्पूर्वी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलही कोरोनाच्या विळख्यात सावडला होता आणि वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेतून त्याला बाहेर केले गेले होते. भारतीय संघ सध्या अहमदाबादमध्ये विलगिकरणात आहे.
वेस्ट इंडीविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेचे सामने ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला पार पडतील. एकदिवसीय मालिकेचे हे तिन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळळे जातील. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळली जाईल. टी-२० मालिकेतील सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जातील.
महत्वाच्या बातम्या –
केरला ब्लास्टर्सचा विजयपथावर परतण्याचा प्रयत्न, अडखळणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान
कर्णधार यशच्या शतकानंतर लक्ष्मणच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अभिमान, रिऍक्शनचा व्हिडिओ व्हायरल