---Advertisement---

भारतीय यष्टीरक्षकाने ५००च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा, फक्त बाउंड्रींनी धावा करणारा पहिलाच क्रिकेटर

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 7:13 PM
Dinesh-Bana
---Advertisement---

वेस्ट इंडिजमध्ये सध्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ (U-19 World Cup) चा थरार सुरू आहे. आयसीसीद्वारा आयोजित ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भिडणारे दोन्ही संघही निश्चित झाले आहेत. ५ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड (INDvsENG) यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना (U-19 World Cup Final) रंगणार आहे. इंग्लंडने अफगाणिस्तानला १५ धावांनी नमवत अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. तर भारताने ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे.

भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार शेख राशिद यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. त्यांच्याबरोबरच शेवटी फलंदाजीला येत जोरदार फटकेबाजी करत यष्टीरक्षक दिनेश बाना (Dinesh Bana) यानेही संघाच्या विजयात सहकार्य केले. त्याने डावाच्या शेवटी फलंदाजी करताना विस्फोटक खेळी केली आणि यासह एक अनोखा (Dinesh Bana’s Record) विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

हेही वाचा- वडिलांना बनवायचं होतं इंजिनियर, पण पोरानं निवडलं क्रिकेट; आता सेमीफायनलमध्ये ५००च्या स्ट्राईक रेटने काढल्या धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. त्यांनी १३ षटकांमध्ये केवळ ३७ धावांवर आपली सलामी जोडी गमावली होती. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी ६ धावा तर दुसरा सलामीवीर हरनूर सिंग वैयक्तिक १६ धावांवर पव्हेलियनला परतले होते. मात्र पुढे शेख राशिद आणि कर्णधार यश धूल यांनी संघाचा डाव सावरला. त्यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी झाली.

पुढे कर्णधार यश ११० चेंडूत ११० धावा करत धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान १ षटकार आणि १० चौकार मारले. तर राशिदचे शतक फक्त ६ धावांनी हुकले. १०८ चेंडूत ९४ धावा करत त्याने आपली विकेट गमावली. त्यानंतर राजवर्धन हंगरगेकर १३ धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे दिनेश बाना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

डावातील ४९ व्या षटकातील शेवटचे ३ खेळण्याची संधी दिनेशला मिळाली. त्याने या तिनही चेंडूंना सीमारेषेपार टोलवले. पहिल्या २ चेंडूंवर सलग २ षटकार आणि पुढील अखेरच्या चेंडूवर दिनेशने खणखणीत चौकार ठोकला. त्यानंतर शेवटच्या षटकातही एक चेंडू खेळताना त्याने शानदार चौकार मारला. अशाप्रकारे १७ वर्षीय दिनेशने ४ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २० धावा काढल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल ५०० होता. 

यासह दिनेश महिला, पुरुष आणि १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये ४ किंवा त्यापेक्षा जास्त चेंडूंवर केवळ बाउंड्री मारत धावा बनवणारा जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू बनला आहे. (Runs Scored By Boundaries Only)

महत्त्वाच्या बातम्या-

वडिलांना बनवायचं होतं इंजिनियर, पण पोरानं निवडलं क्रिकेट; आता सेमीफायनलमध्ये ५००च्या स्ट्राईक रेटने काढल्या धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---