भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या स्ट्राईक रेटच्या कारणास्तव टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. शनिवारी (22 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात लखनऊला विजयासाठी अवघ्या 135 धावा हव्या होत्या. पण तरीदेखील लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभव स्वीकारावा लागला. केएल राहुल या पराभवास कारणीभूत आहे, असे अनेकांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुलच्या आयपीएलमधील काही निराशाजनक आकडेवारी देखील समोर आल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) यांच्यात शनिवारी खेळला गेलेला हा सामना कमी धावसंख्ये हातो. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सला 7 बाद 128 धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनऊने हा 7 धावांनी पराभव स्वीकारला. लखनऊचा कर्णदार केएल राहुल याने 61 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 68 धावा साकारल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 111.47 होता. या खेळीनंतर राहुलची निराशाजनक आकडेवारी समोर आली आहे.
राहुलने आयपीएल 2023 मध्ये लखनऊच्या विजयापेक्षा पराभवात अधिक धावांचे योगदान दिले आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्सने या हंगामातील सात पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. या सात सामन्यात राहुलने संघासाठी 95 टेंडूत 100 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे पराभूत झालेल्या सामन्यातंमध्ये राहुलने 136 चेंडू खेळून 162 धावा केल्या आहेत. लखनऊने गमावलेल्या मागच्या दोन सामन्यांमध्ये राहुलने अर्धशतके केली आहेत.
आयपीएल इतिहासात राहुलने आतापर्यंत 26 सामन्यांमध्ये 50पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला आहे. या 26 पैकी 12 सामन्यात राहुलचा संघ पराभूत झाला आहे. म्हणजेच राहुलने 50 चेंडू खेळल्यानंतर संघाची पराभवाची शक्यता 46% असते. लक्ष्याचा पाठलाग करताना राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 वेळा 50 पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत. या 12 पैकी 6 सामन्यात राहुलचा संघ पराभूत झाला. राहुने लक्ष्याचा पाठलाग करताना 50 किंवा त्यापेक्षा जास्त चेंडू खेळले, तर त्याच्या संघाची पराभवाची शक्यता 50% असते. (KL Rahul’s Disappointing IPL Stats)
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 50पेक्षा जास्त चेंडू खेळून पराभव स्वीकारणारे खेळाडू
केएल राहुल – 26 पैकी 12 सामन्यांमध्ये पराभव
शिखर धवन – 22 पैकी 7 सामन्यांमध्ये पराभव
डेविड वॉर्नर – 21 पैकी 6 सामन्यांमध्ये पराभव
विराट कोहली – 20 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव
ख्रिस गेल – 17 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सामनावीर पुरस्कारासाठी…’, मुंबईला पराभूत केल्यानंतर सॅम करनने जिंकली चाहत्यांची मने
‘अर्जुन तेंडुलकरमुळेच हारली मुंबई इंडियन्स’, भारताच्या माजी दिग्गजाचे कारणासहित स्पष्टीकरण