टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत आणि स्कॉटलंड यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने स्कॉटलंडचा दारुण पराभव केला. भारताने या सामन्यात स्कॉटलंडला ८ विकेट्स राखून मात दिली आहे. भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत स्कॉटलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. प्रत्युत्तरात सलामीवीरांनी केलेल्या खेळीच्या जोरावर संघाने विजय मिळवला. सलामीवीर केएल राहुलने अवघ्या १८ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
राहुल आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक वेगाने अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरा खेळाडू ठरला आहे.
केएल राहुलने स्कॉटलंडविरुद्ध १८ चेंडूंमध्ये सहा चौकर आणि तीन षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या आणि १९ व्या चेंडूवर तो बाद झाला. भारतीय संघासाठी सर्वाधिक वेगाने आणि कमी चेंडूत आंतरराष्ट्रीय टी२० अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंचा विचार केला, तर यामध्ये भारताचा दिग्गज युवराज सिंग पहिल्या क्रमांकावर आहे. आता स्कॉटलंडविरुद्ध केलेल्या खेळीनंतर केएल राहुल या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. युवराजने २००७ सालच्या टी२० विश्वचषकात १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. हा जागतिक विक्रम देखील आहे.
तसेच टी२० विश्वचषकातील सर्वाधिक वेगाने केलेल्या अर्धशतकांचा विचार केला तर केएल राहुलने या यादीत तिसरे स्थान गाठले आहे. तो ग्लेन मॅक्सवेलसह संयुक्तरित्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेगाने केलेली अर्धशतके
१. २००७ युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड (१२ चेंडू)
२. २०२१ केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड (१८ चेंडू)
३. २००९ गौतम गंभीर विरुद्ध श्रीलंका (१९ चेंडू)
४.२००७ युवराज सिंग विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२० चेंडू)
५. २००७ युवराज सिंग विरुद्ध श्रीलंका (२० चेंडू)
६. २०१९ विराट कोहली वेस्ट इंडीज (२१ चेंडू)
टी२० विश्वचषकात सर्वाधिक वेगाने अर्धशतक पूर्ण करणाऱ्यांचा विचार केला, तर भाराताचा दिग्गज युवराज सिंगच या यादीतही पहिल्या प्रामांकावर आहे. केएल राहुल या यादीत नव्याने सामील झाल आहे.
टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वेगाने अर्धशतक पूर्ण करणारे खेळाडू
१. २००७ युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड (डर्बन, १२ चेंडूत)
२. २०१४ स्टिफन मायबर्ग विरुद्ध आयर्लंड (सॅल्हेट, १७ चेंडूत)
३. २०१४ ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध पाकस्तान (मीरपूर, १८ चेंडूत)
४. २०२१ केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड (दुबई, १८ चेंडूत)
दरम्यान, भारत आणि स्कॉटलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंड संघ प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांसमोर १७.४ षटकांमध्ये ८५ धावांवर सर्वबाद झाला.
प्रत्युत्तरात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत संघाला चांगली सुरुवात केरून दिली. पहिल्या विकेटसाठी सलामीवीर जोडीने ७० धावा केल्या. रोहित शर्माने १६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या आणि बाद झाला. केएल राहुलने १९ चेंडूत सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.
गोलंदाजीमध्येही भारतीय खेळाडूंनी कमाल केली. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १५ धावा दिल्या आणि प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स आणि रविचंद्रन अश्विनेही एक विकेट घेतली. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळाला आहे. ग्रुप दोन मध्ये भारतीय संघने अफगाणिस्तानला मागे टाकले आणि तिसरे स्थान गाठले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवशी विराटने जिंकला टॉस अन् नावावर झाला अनोखा विक्रम; रिचर्ड्स, स्मिथच्या पंक्तीत सामील
टी२० विश्वचषक: उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंडचा मार्ग सुकर, नामिबियाचा केला ५२ धावांनी पराभव
खुलासा! ‘या’ कारणामुळे रोहित घालतो ४५ क्रमांकाची जर्सी, स्वत: ‘हिटमॅन’ने उघड केले गुपीत