टी20 विश्वचषक 2022 (2022 T20 World Cup) मधील सर्वात बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्यादरम्यान मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत पाकिस्तानला 159 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) हा अपयशी ठरला. त्यानंतर त्याच्या मागील दीड वर्षातील कामगिरीची अतिशय धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.
पाकिस्तानने संघर्ष करत भारतीय संघासमोर या सामन्यात विजयासाठी 160 धावांचे लक्ष ठेवले. त्याचा पाठलाग करताना संघाचा उपकर्णधार केएल राहुल हा पुन्हा एकदा अपयशी ठरला. दुसऱ्याच षटकात नसीम शहाने त्याचा त्रिफळा उडवला. राहुलने 8 चेंडूवर 4 धावा केल्या.
राहुल पाकिस्तान विरुद्ध सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या चार सामन्यात केवळ 8.75 च्या सरासरीने धावा बनवलेल्या आहेत. त्याची 2021 पासूनची आकडेवारी पाहिल्यास ती अतिशय खराब दिसून येते. राहुल पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व इंग्लंड या संघाविरुद्ध खेळताना केवळ 21 च्या सरासरीने व 116 च्या स्ट्राईक रेट ने फलंदाजी करू शकला आहे. तर दुसरीकडे श्रीलंका, स्कॉटलंड, अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध त्याची बॅट चांगली बोलताना दिसली. या देशांविरुद्ध त्याने 55 च्या सरासरीने व 145 पेक्षा जास्त जास्तच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल
टी20 विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय दोनच, एक अर्शदीप तर दुसरा….