इंडियन प्रीमियम लीग २०२१ मधील ५६ सामने संपले आहेत आणि चार संघ प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत. यावेळी दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे आणि आता यापैकी एक संघ या हंगामाचा विजेता बनेल. यावेळी खेळलेल्या सर्व साखळी फेरी सामन्यांमध्ये, अनेक फलंदाजांनी मैदानावर आपली ताकद दाखवली आणि गगनचुंबी लांब षटकार मारले, ज्यामुळे प्रेक्षकांचे देखील भरपूर मनोरंजन केले.
आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ५६ साखळी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत केएल राहुल पहिल्या स्थानावर आहे. केएल राहुल साखळी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्यात यशस्वी झाला आहे आणि या हंगामात ६०० धावा करणारा एकमेव फलंदाजही ठरला आहे. केएल राहुलने या मोसमात एकूण १३ साखळी फेरी सामने खेळले, ज्यात त्याने ६२.६० च्या सरासरीने ६२६ धावा केल्या आहेत. या मोसमात त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ९८ अशी होती. या सामन्यांमध्ये राहुलच्या बॅटमधून एकूण ३० षटकार आले आहेत. म्हणजेच त्याने १३ सामन्यांमध्ये एकूण ३० षटकार मारले आणि साखळी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.
केएल राहुलनंतर, आरसीबीचा झंझावाती अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याने १४ सामन्यात २१ षटकार ठोकले आहेत. याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी १४ सामन्यांत प्रत्येकी २० षटकार मारून संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले आहे. पंजाबचा मयंक अग्रवाल १२ सामन्यांत १८ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे. तर अंबाती रायडू आणि संजू सॅमसन १४ सामन्यात १७ षटकारांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तीन भारतीय खेळाडू, ज्यांना टी२० विश्वचषकापूर्वी निवडकर्ते दाखवू शकतात बाहेरचा रस्ता
चेन्नई वि. दिल्ली संघांचे हेड टू हेड रिकॉर्ड, बघा पहिल्या क्वालिफायरमध्ये कोणाचं पारडं दिसतंय जड?