भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलला वर्ष 2019 मध्ये भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. पण आता केएल राहुलने असे पुनरागमन केले आहे की, संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याला सलाम केला जात आहे. नुकतेच इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने शानदार शतक झळकावले आहे.
लॉर्ड्स मैदानावरील शतकासह त्याने त्याच्या फलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्व टीकाकारांचे तोंड बंद झाले आहे. त्याने लॉर्ड्सवर कठीण परिस्थितीत जबरदस्त फलंदाजी केली आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. या एका शतकासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याच्या या उत्कृष्ट शतकाबद्दल पाच मोठ्या गोष्टी जाणून घेऊया.
1. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणारा केएल राहुल हा तिसरा भारतीय सलामीवीर आहे. केएल राहुलच्या आधी, 1952 साली लॉर्ड्सवर विनू मांकड यांनी शतक झळकावले होते. तसेच माजी अष्टपैलू रवी शास्त्रींनी 1990 मध्ये हा पराक्रम केला होता.
2. आशियाबाहेर शतक ठोकण्याच्या बाबतीत केएल राहुलने वीरेंद्र सेहवागशी बरोबरी केली आहे. राहुलची आशियाबाहेर चार कसोटी शतके आहेत. पण इथे महत्वाची गोष्ट म्हणजे या फलंदाजाने सेहवागच्या दुप्पट वेगाने ही कामगिरी केली आहे. सेहवागने 59 डावांमध्ये आशियाबाहेर 4 शतके केली होती. तर राहुलला हे काम करण्यासाठी फक्त 28 डाव लागले आहेत. आशियाबाहेर सुनील गावस्कर यांच्या नावे सर्वाधिक 15 शतके आहेत.
3. गेल्या 6 वर्षांत भारताने आशियाबाहेर फक्त चार शतके केली आहेत आणि ही चारही शतके केएल राहुलच्या बॅटमधून आली आहेत.
4. केएल राहुलचे इंग्लंडच्या मैदानांवर थोडे अधिक प्रेम आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 13 शतके केली आहेत, त्यापैकी त्याने इंग्लंडमध्ये सर्वाधिक 4 शतके केली आहेत. तर भारतात 3 शतके केली आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी एक एक शतक लगावले आहेत.
5. केएल राहुल हा भारताचा तिसरा क्रिकेटपटू आहे, ज्याने इंग्लंडमधील लॉर्ड्स आणि ओव्हल येथे शतक केले आहे. राहुलच्या आधी रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ओहो! केएल राहुलच्या झुंजार शतकाचे प्रेयसी अथियाकडून कौतुक, व्हिडिओ करत लिहिले…
‘नातं पक्कचं समजायच म्हणजे’! राहुलच्या शतकाने सुनिल शेट्टी इंप्रेस, अशी प्रतिक्रिया देत वेधले लक्ष
लॉर्ड्समध्ये रोहित-राहुल जोडीचे वादळ, शतकी भागिदारी करत मोडला ‘हा’ ६९ वर्षे जुना विक्रम