---Advertisement---

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या चौथ्या दिवशी एकतर्फी लढती

---Advertisement---

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या चौथ्या दिवशी एकतर्फी लढती बघायला मिळाल्या. पालघर काझीरंगा रहिनोस संघाने विजयाचा खात उघडलं तर, अहमदनगर संघाने विजयाचा चौकार लावला. तर पुणे पलानी टस्कर्स संघाने मुंबई उपनगर संघाला धक्का देत दुसरा विजय मिळवला.

पहिल्या लढतीत पालघर काझीरंगा रहिनोस संघाने लातूर विजयनगारा संघाचा 49-23 असा धुव्वा उडत पहिला विजय मिळवला. राज साळुंखे व राहुल सवरने सुपर टेन पूर्ण करत संघाचा पहिला विजय साकारला. दुसऱ्या सामन्यात अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने रायगड मराठा मार्वेल्स संघाचा 40-26 असा पराभव करत विजयचा चौकार लावला. अहमदनगर कडून शिवम पटारे व प्रफुल झावरे यांनी सुपर टेन तर अजित पवार ने हाय फाय पूर्ण केला.

पुणे पलानी टस्कर्स संघाने मुंबई उपनगर संघाचा 44-26 असा धक्कादायक पराभव करत दुसरा विजय साजरा केला. आज पुणेच्या संघात बदल बघायला मिळाला. बबलू गिरीच्या जागी संघात विशाल ताटे ला स्थान देण्यात आला. विशाल ताटे ने पहिल्याच सामन्यात आपली छाप पडत पुणे संघाला विजय मिळवून दिला. आजच्या शेवटच्या सांगली विरुद्ध कोल्हापूर सामन्यात कोल्हापूर संघाने 49-30 असा विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या क्रमांक गेला. या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघानी मिळून तब्बल 8 सुपर टॅकल सह एकूण 37 टॅकल गुण मिळवले.

● आजच्या दिवशी 3 खेळाडूंनी या स्पर्धेत चढाईत 50 गुणांचा टप्पा पार केला.
61 – तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
55 – शिवम पटारे, अहमदनगर पेरियार पँथर्स
50 – राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---