---Advertisement---

दुसऱ्या विजयासह कोल्हापूर ताडोबा टायगर्सची चौथ्या स्थानी झेप

On: रविवार, एप्रिल 2, 2023 11:29 PM
---Advertisement---

आजच्या दिवसाचा शेवटचा सामना दोन शेजारील प्रतिस्पर्धी संघ सांगली व कोल्हापूर यांच्या झाला. पहिल्या 10 मिनिटात कोल्हापूरच्या चढाईपटू विरुद्ध सांगलीच्या बचावपटू मध्ये सामना बघायला मिळाला. मात्र पुन्हा एकदा तेजस पाटीलने आपला जोरदार खेळ करत सांगली सिंध सोनिक्स संघावर लोन पाडला.

सांगलीच्या प्रणव माने ने चांगल्या पकडी करत सामन्यात चुरस निर्माण केली. मध्यंतरापर्यत सांगली संघाने 3 सुपर टॅकल करत कोल्हापूर संघाची आघाडी कमी केली. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे 20-17 अशी आघाडी होती.

20-20 असा सामना सुरू असताना कोल्हापूरच्या शुभम पाटील ने वृषभ साळुंखेचा सुपर टॅकल करत आघाडी पुन्हा वाढवली. सामन्याची शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना 31-23 अशी कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाकडे आघाडी होती. कोल्हापुर संघाने 49-30 असा विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकवर झेप घेतली.

संपूर्ण सामन्यात कोल्हापूर संघाने 3 तर सांगली संघाने 5 सुपर टॅकल करत सामना रंगतदार केला. संपूर्ण सामन्यात पकडीत सांगलीच्या प्रणव माने ने सर्वाधिक 9, साहिल कुचिवले ने 7 तर कोल्हापूरच्या साईप्रसाद ने 8 व तेजस पाटीलने 4 पकडीत गुण मिळवत सामना रंगवला.

बेस्ट रेडर – तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर – प्रणव माने, सांगली सिंध सोनिक्स
कबड्डी का कमाल – साईप्रसाद पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---