इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे. पण जवळपास सर्वांसाठीच उर्वरित सामने महत्त्वाचे आहेत. त्यातच मुंबई इंडियन्सला काहीदिवसांपूर्वी मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याला डाव्या हाताच्या दुखापतीमुळे बाहेर जावे लागले होते. आता त्याच्या ऐवजी बदली खेळाडूची घोषणा मुंबई इंडियन्सने केली आहे.
सूर्यकुमारच्या जागेवर आकाश मधवालला संधी
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) जागेवर आकाश मधवाल (Akash Madhwal) याला संधी दिली आहे. २८ वर्षीय मधवाल हा भारतातील उत्तराखंड राज्याचा असून या राज्य संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याचा जन्म रुडकी शहरात २५ नोव्हेंबर १९९३ साली झाला. तो मध्यमगती गोलंदाज आहे. तसेच उजव्या हाताने फलंदाजी करतो.
त्याने २०१९ साली उत्तराखंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याआधी त्याने २०१९ सालीच उत्तराखंडकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर त्याने २०२१ साली त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण, अद्याप त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळालेली नाही. पण, आता मुंबई इंडियन्सकडून त्याला खेळण्याची संघी मिळू शकते.
मधवाल हा आयपीएल २०२२ साठी (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा आधीपासून सदस्य होता. त्याला हंगामाच्या आधी झालेल्या शिबिरासाठीही निवडण्यात आले होते. दरम्यान, त्याने केलेल्या प्रदर्शनाने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी प्रभावित झाली, त्यामुळे त्याला आता मुख्य संघात निवडण्यात आले असल्याचे समोर येत आहे.
मधवालची कामगिरी
मधवालने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ६ प्रथम श्रेणी सामने, ११ अ दर्जाचे सामने आणि १५ टी२० सामने खेळले आहेत आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८ विकेट्स घेतल्या असून ३२ धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी२०मध्ये त्याने आत्तापर्यंत १५ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई प्लेऑफमधून बाहेर
मुंबई इंडियन्स यापूर्वीच आयपीएल २०२२ हंगामातील प्लेऑफ फेरीतून बाहेर पडले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत १२ सामने खेळले असून ३ सामने जिंकले आहेत आणि ९ सामने पराभूत झाले आहेत. आता त्यांना शेवटचे २ सामने खेळायचे असून गुणतालिकेतील अखेरचे स्थान टाळण्यासाठी त्यांना हे दोन्ही सामने महत्त्वाचे असणार आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘कठीण परिस्थितीत प्रदर्शन करायला…’, पंजाबविरुद्धचा ‘मॅन ऑफ द मॅच’ शार्दुल ठाकूरची खास प्रतिक्रिया
पंजाब प्लेऑफमधून जवळपास बाहेर! कर्णधाराने ‘या’ गोष्टीला धरले दिल्लीविरुद्धच्या पराभवासाठी जबाबदार
साहाने आयपीएलमधील प्रदर्शनाचे मिळाले बक्षीस, ‘या’ स्पर्धेसाठी होणार पुनरागमन