7 जूनला श्रीलंका दौऱ्यासाठी १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली होती. या दौऱ्यात अर्जून तेंडूलकरची चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाल्याने आयसीसी पासून सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
मात्र अर्जून तेंडूलकरच्या निवडीच्या चर्चेत यशस्वी जयस्वाल या युवा क्रिकेटपटूकडे दुर्लक्ष झाले.
श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झालेल्या यशस्वी जयस्वालचा पाणीपुरीच्या गाड्यापासून १९ वर्षाखालील भारतीय संघापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.
यशस्वी वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन एकटा उत्तर प्रदेशमधील भदोहीहून मुंबईत आला.
त्याने मुंबईमध्ये आझाद मैदानावरील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये कित्येक दिवस उपाशी पोटी काढले मात्र त्याने आपली जिद्द सोडली नाही.
त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची असूनही वडील त्याला पैसे पाठवायचे मात्र तेवढे पैसे त्याला पुरत नव्हते. त्यासाठी त्याला पाणीपुरीचा गाडाही चालवावा लागला.
यशस्वी जयस्वालच्या खेळावर १९ वर्षाखालील मुंबई संघाचे प्रशिक्षक सतिश सामंत खूप प्रभावित झाले आहेत. त्यांनी यशस्वी पुढे जाऊन मुंबई क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावणार असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच सतिश सामंत यानी यशस्वी जयस्वालच्या यशाचे श्रेय त्याच्या मुस्लिम युनायटेड क्लबचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांना दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादव काही ऐकेना! केला असा कारनामा की इंग्लंडचे फलंदाज फक्त पहात राहिले
-अखेर कर्णधार-उपकर्णधाराच्या रेसमध्ये विराटचा रोहितवर विजय