भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे भारताच्या दिग्गज फलंदाजांमध्ये आणि कर्णधारांमध्ये गणले जातात. तीन वनडे विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारे ते एकमेव भारतीय कर्णधार आहेत. आज (८ फेब्रुवारी) त्यांचा ५८ वा वाढदिवस. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आजपर्यंत अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याचा घेतलेला हा आढावा.
बालपण आणि शिक्षण
मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६३ रोजी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे झाला. अजहर हैदराबादमध्येच लहानाचे मोठे झाले. त्याचे प्रारंभिक शिक्षण हैदराबादच्या ऑल सेंट हायस्कूलमध्ये झाले. त्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षण खूप चांगले दिले जात असे. क्रिकेट खेळत असतानाच त्यांनी निझाम कॉलेज, उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथून बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी प्राप्त केली.
कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन
अजहर यांनी दोन विवाह केले आहेत. पहिला विवाह नौरीन सोबत झाला तर दुसरा विवाह हा प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री संगीता बीजलानी यांच्यासोबत झाला. पहिल्या पत्नीकडून अजहर यांना असद आणि अयाज नामक दोन मुले आहेत. अजहर आणि त्यांची पत्नी नौरीन यांचा लग्नाच्या ९ वर्षानंतर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अजहरने १९९६ मध्ये संगीता बीजलानी सोबत लग्न केले. मात्र १४ वर्षांनंतर दोघांनीही त्यांच्या इच्छेनुसार घटस्फोट घेतला. अजहरच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्या देखील मीडियामध्ये आल्या होत्या. मात्र त्या चुकीचा असल्याचे सिद्ध झाले.
दिनांक १६ सप्टेंबर २०११ रोजी त्यांचा मुलगा अयाज याचे वयाच्या १९ व्या वर्षी एका अपघातात निधन झाले.
क्रिकेट कारकीर्द
अझरुद्दीनने इंग्लंडविरुद्ध सन १९८४-८५ मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीची सुरवात केली होती. ९९ कसोटी सामन्यांमध्ये ४५.३ च्या सरासरीने ६२१५ धावा त्यांनी केल्या. ज्यात २२ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. पहिल्या कसोटी सामन्यात सलग तीन शतके ठोकून त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरवात केली होती. त्यांची सर्वाधिक धावसंख्या ही श्रीलंकेविरुद्ध १९९ ही होती.क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले होते.
क्रिकेटमध्ये तो पहिला खेळाडू ठरला ज्याने आपल्या कसोटी पदार्पणापासून लागोपाठच्या सलग तीन कसोटी सामन्यात शतके झळकविण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या नावावर एकदिवसीय सामन्यात ९३७८ धावा आहेत. ज्यात ७ शतके आणि ७८ अर्धशतकांचा समावेश आहे.
कर्णधार म्हणूनही गाजवले नाव
अझरुद्दीन हे एक खेळाडू तसेच कर्णधार म्हणून सुद्धा यशस्वी झाले आहेत. १९८९ मध्ये त्यांनी कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यानंतर अझरुद्दीन भारतीय संघाचे कर्णधार बनले. कर्णधार पदावर असताना त्यांनी भारतीय संघासाठी १०३ सामने जिंकले आहेत. भारताच्या यशस्वी कर्णधार यांच्यापैकी ते एक आहेत ज्यांनी ९० एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळवून दिला.
खास आकडेवारी-
– कसोटी क्रिकेटमध्ये ४५ च्या सरासरीने २ शतके, आणि – एकदिवसीय सामन्यात ३७ च्या सरासरीने ७ शतके
– पदार्पणात तीन कसोटी सामन्यात ३ शतके झळकावणारा पहिला फलंदाज
– क्षेत्ररक्षक म्हणून एकदिवसीय सामन्यात १५६ झेल
– श्रीलंकेविरुद्ध कसोटीतील सर्वाधिक १९९ धावा
१९९१ मध्ये ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ नावाने सन्मानित
मॅच फिक्सिंग प्रकारण
सन २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अझरुद्दीन यांच्यावर आरोप केले गेले. ते दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली गेली. पण ८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अझरुद्दीनवरील बीसीसीआयने घातलेली बंदी उठवली. सलग ११ वर्षे कोर्टात ही लढाई चालू होती.
राजकीय कारकीर्द
दिनांक १९ फेब्रुवारी २००९ रोजी ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्याचवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून निवडणूक लढवली होती आणि विजयी सुद्धा झाले होते.
चरित्रपट
दिनांक १३ फेब्रुवारी २०१६ रोजी यांच्या जीवनावर आधारित टोनी डिसुजा यांच्या दिग्दर्शनाखाली “अजहर” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात त्यांची भूमिका इम्रान हाश्मी याने साकारली होती. तर त्यासोबतच प्राची देसाई, नर्गिस फाखरी आणि हुमा कुरेशी या देखील प्रमुख भूमिकेत होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“हा संघ भेकड…”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची इंग्लंडवर टीका
अनुष्काने बर्प क्लोथसोबत फोटो अपलोड करताच हार्दिक पंड्याची मजेशीर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला
व्हिडिओ : सामना चालू असतांना भर मैदानात आली मांजर, मग नंतर घडले असे काही…