मुंबई। डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मधील सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यातून मुंबईकडून कुमार कार्तिकेय सिंगने पदार्पण केले. त्याची कामगिरीही या सामन्यात चांगली राहिली. त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.
कुमार कार्तिकेयची पहिल्याच सामन्यातील कामगिरी
कुमार कार्तिकेय सिंगने (Kumar Kartikeya Singh) पहिला सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळला. हा सामना खेळताना त्याने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ १९ धावा दिल्या. दरम्यान, त्याने राजस्थान रॉयल्स संघाचा यष्टीरक्षक कर्णधार संजू सॅमसनला बाद केले. त्याच्या गोलंदाजीवर सॅमसनने १६ धावांवर टीम डेव्हिडकडे झेल सोपवला.
कोण आहे कुमार कार्तिकेय?
खरंतर कुमार कार्तिकेय सिंग आयपीएल २०२२ च्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सच्या मुख्य संघाचा भाग नव्हता. परंतु, हा हंगाम सुरू झाल्यानंतर मोहम्मद अर्शद खान (Mohammad Arshad Khan) दुखापतग्रस्त झाला. त्याचमुळे कुमार कार्तिकेय सिंगला मुंबई इंडियन्स संघाने मोहम्मद अर्शद खानचा बदली खेळाडू म्हणून संघात स्थान दिले. त्याला २० लाखांच्या किंमतीत मुंबई इंडियन्सने संधी दिली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुमार कार्तिकेय सिंग हा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा भाग होता. त्याने नेटमध्ये गोलंदाजीही केली आहे. त्यानंतर त्याच्या कौशल्यावर प्रभावित होत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला मुख्य संघाचा भाग बनवला आहे.
२४ वर्षीय कुमार कार्तिकेय सिंगचा जन्म उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे झाला आहे. पण, तो देशांतर्गत क्रिकेट मध्यप्रदेशकडून खेळतो. तो अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच तो चायनामन गोलंदाजी करतो. त्याने २०१८ साली मध्यप्रदेशकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ९ प्रथम श्रेणी, १९ अ दर्जाचे आणि ९ टी२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३५ विकेट्स, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १८ विकेट्स आणि टी२० क्रिकेटमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
विराटला हरवताच हार्दिक पांड्याची मोठी प्रतिक्रिया, “इथे ज्युनियर सिनियर काही नसतं”
केविन पीटरसनने निवडले आयपीएल २०२२ विजेतेपदाचे ३ प्रबळ दावेदार, हार्दिकच्या संघाचाही समावेश
‘थाला इज बॅक’, धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार बनताच सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ