भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चर्चेचा विषय बनत आहे. सूर्यकुमार त्याच्या फलंदाजी आणि जबरदस्त फॉर्ममुळे चर्चेत आहे. सूर्यकुमारने रविवारी (20 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वादळी शतक केले. भारताने हा सामना 65 धावांनी जिंकला असून सूर्यकुमाचा या विजयात महत्वाचा वाटा होता. मागच्या काही महिन्यांमध्ये सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीचे प्रदर्शन करताना दिसला आहे, त्यामुळे चाहत्यामध्ये त्याच्याविषयी उत्सुकता अधिकच वाढत चालली आहे. चला तर जाणून घेऊ त्याचे कुटुंब आणि मुळ गावाविषयी.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 51 चेंडू खेळला आणि 111 धावांची नाबाद खेळी त्याने केली. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वात कमी चेंडूत एक हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने या 1000 टी-20 धावा अवघ्या 573 चेंडूत केल्या. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल च्या नावावर होता. मॅक्सवेलने 604 चेंडूत 1000 टी-20 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादव मुळचा उत्तर प्रदेशच्या गाझीपुर जिल्ह्यातील आहे. त्याच्या गावाचे नाव ‘हथौडा’ असे आहे. आजही त्यांचे इतर कुटुंबीय याच गावात राहतात. त्याचे वडील अशोक कुमार यादव मात्र आधीच मुंबईला स्थलांतरित झाले होते. सूर्याचे वडील मुंबई स्थित भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये इंजीनियर होते. तसेच त्याचे आजोबा विक्रमा यादव सीआरपीएसचे अधिकारी होते. वडील मुंबईत नोकरीला असल्यामुळे सूर्यकुमार देखील मुंबईतच लहानाचा मोठा झाला. परमाणु उर्जा केद्रीय विद्यालय याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायंस याठिकाणी त्याने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले.
सूर्यकुमारने जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली, तेव्हा त्याचे पहिले प्रशिक्षक त्याचेच चुलते विनोद यादव होते. मात्र, पुढे जाऊन त्यांना मोठ्या क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला आणि पर्यायाने प्रशिक्षक देखील नवीन मिळाले. या प्रशिक्षकांकडूनच सूर्याने क्रिकेटचे बारकावे शिकले.
रणजी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी –
काही दिवसांपूर्वी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमारने अनेक मुद्यांवर स्पष्टीकरण दिले होते. यावेळी त्याने सांगितल्यानुसार कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउच्या काळात त्याने स्वतःच्या फिटनेसवर काम केले. लॉकडाउनमध्ये केलेली मेहनत आता सूर्याच्या कामी येत असल्याचे आपण पाहू शकतो. दरम्यान, 2013 मध्ये सूर्याने भारताच्या 23 वर्षांखाली संघाचे नेतृत्व केले आहे. रनजी ट्रॉफी 2011-12 मध्ये त्याने ओडिसा संघाविरुद्ध द्विशतकही केले होते आणि या हंगामात सर्वाधिक 754 धावाही त्याच्याच होत्या. (Know about the academic life of Suryakumar Yadav who excelled in the field of cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतीय म्हणतात दिग्गज, पण आपलेच काढतात इज्जत’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे दु:ख आले बाहेर
अरुणाचल प्रदेशची असामान्य कामगिरी! लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला जगात कुणालाच न जमलेला विक्रम