भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे आणि त्यांनी तिथे न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिकाही खेळली आहे. भारताने या मालिकेतील पहिले ४ सामने गमावले, परंतु शेवटच्या सामन्यात विजय मिळवत फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले. अशातच महिला क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महिला वनडे विश्वचषकाचा (Womens ODI World Cup) १२ वा हंगाम येत्या ४ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा एकूण ३१ दिवस चालणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना ३ एप्रिल रोजी खेळला जाईल. चला तर या स्पर्धेबाबत जाणून घेऊया…
लोकप्रियतेमध्ये वाढ
महिला क्रिकेट आता झपाट्याने लोकप्रिय होत आहे. इंग्लंडमध्ये २०१७ च्या विश्वचषकानंतर भारतातील महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला होता. या स्पर्धेची रँकिंगही खूप वर गेली होती. यामुळे महिला क्रिकेटला एक नवीन ओळख मिळाली आणि लोक पूर्वीपेक्षा जास्त फॉलो करू लागले. असे म्हटले जाते की, त्या विश्वचषकाची दर्शक संख्या १८० दशलक्ष म्हणजेच १८ कोटींहून जास्त होती.
यावेळी विश्वचषक न्यूझीलंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेचा मागील विश्वचषक पाहता यावेळीही ही स्पर्धा यशाचे नवे उदाहरण घालून देईल, अशी आयोजकांना आशा आहे. यावेळी कोव्हिड-१९ महामारीमुळे विश्वचषक १३ महिन्यांनंतर होत आहे.
संघ आणि त्यांचे कर्णधार
पहिला महिला विश्वचषक १९७३ साली झाला होता. म्हणजे पुरुषांच्या विश्वचषकाच्या दोन वर्षे आधी. आता हा या स्पर्धेचा १२ वा हंगाम आहे.
ऑस्ट्रेलिया- मेग लॅनिंग
बांगलादेश- निगार सुलताना
भारत- मिताली राज
इंग्लंड- हीदर नाईट
दक्षिण आफ्रिका- सुन लुउस
पाकिस्तान- बिस्माह मारूफ
वेस्ट इंडिज- स्टेफनी टेलर
कुठे आणि केव्हा खेळली जाईल विश्वचषक स्पर्धा?
महिला विश्वचषकाची सुरुवात ४ मार्च, २०२२ रोजी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघातील सामन्याने होईल. हे सर्व साखळी सामने २७ मार्चपर्यंत सुरू राहतील. ग्रूपमधील शेवटचा साखळी सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होईल.
मैदानाची क्षमता
ऑकलंड- ४२०००
ख्राईस्टचर्च- १८०००
डंडलिन- ३५००
हेमिल्टन- १००००
माऊंट माऊंगनुई- १००००
वेलिंग्टन- ११६००
ही स्पर्धा ३१ दिवस चालणार आहे. या ३१ दिवसांत एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत टॉप-४ संघ उपांत्य सामन्यासाठी क्वालिफाय करणार आहेत. उपांत्य फेरीचा पहिला सामना बासिन रिझर्व्ह येथे ३० मार्च रोजी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना ३१ मार्च रोजी हॅगले ओव्हलमध्ये होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३ एप्रिल, २०२२ रोजी खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहा विश्वचषक जिंकले आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले, तर गेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. इंग्लंडने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर यजमान न्यूझीलंडने एकदाच विश्वचषक जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर