रविवार रोजी (१७ ऑक्टोबर) आयसीसी टी२० विश्वचषकाचा पात्रता फेरीतील पहिला सामना पार पडला. पापुआ न्यू गिनी विरुद्ध ओमान यांच्यात झालेल्या या सामन्यात ओमानने १० विकेट्सने सोपा विजय मिळवला. ओमानच्या या विजयाचा नायक ठरला सलामीवीर फलंदाज जतींदर सिंग. पापुआ न्यू गिनीच्या १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने झंझावती अर्धशतकी खेळी करत संघाला सोपा विजय मिळवून दिला. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने भारतीय सलामीवीर शिखर धवनप्रमाणे जल्लोष करत सर्वांचे लक्षही वेधले. याच जतींदर सिंगविषयी आपण जाणून घेणार आहोत.
जतींदरने पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात सलामीला नाबाद ७३ धावांची खेळी केली आहे. ४२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने आपला सहकारी अकिब एलिससोबत मिळून १३१ धावांची अभेद्य भागिदारी करण्याचाही पराक्रम केला आहे.
एका सामन्यात ५ यष्टीचीत विकेट्सचा विक्रम
जतींदर भलेही ओमान क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत असला तरीही त्याचा जन्म मात्र भारतातला आहे. पंजाबच्या लुधियाना शहरात त्याला जन्म झाला होता. परंतु तो ओमानमध्येच लहानाचा मोठा झाला आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाने ओमानकडून १९ वर्षांखालील क्रिकेट खेळले आहे. याबरोबरच २००७ सालच्या एसीसी १९ वर्षांखालील एलाइट चषकातही तो ओमान संघाचा भाग होता. हाँगकाँगविरुद्धच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एका सामन्यात ५ फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा मोठा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
🔥 𝐇𝐞 𝐬𝐭𝐨𝐨𝐝 𝐚𝐧𝐝 𝐝𝐞𝐥𝐢𝐯𝐞𝐫𝐞𝐝, 𝐰𝐞 𝐬𝐭𝐨𝐨𝐝 𝐚𝐧𝐝 𝐚𝐩𝐩𝐥𝐚𝐮𝐝𝐞𝐝 🔥@ImJatinder10 did what Jatinder Singh does, by scoring an unbeaten 73 to spearhead us to a superb victory! 👏#OMNvPNG #HayyaCricket #JatinderSingh #HalfCentury #TeamOman #T20WorldCup pic.twitter.com/4Nec5vsyma
— Oman Cricket (@TheOmanCricket) October 17, 2021
२०१२ मध्ये केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण
जतिंदरने २०१२ साली युगांडा संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. २०१९ सालच्या टी२० विश्वचषकातही त्याने ओमान संघाकडून पात्रता फेरीत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. पात्रता फेरीत त्याने ९ सामन्यांमध्ये २६७ धावा चोपल्या होत्या. आतापर्यंत २९ टी२० सामन्यांमध्ये त्याने ७७० धावांची कामगिरी केली आहे. तसेच १९ वनडे सामन्यांमध्ये ४३४ धावा चोपल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तळापासून सुरुवात केली, आता इथे आहे’, पृथ्वी शॉने स्वत:लाच गिफ्ट केली बीएमडब्ल्यू कार; पाहा फोटो
सराव सामने ठरवणार ‘या’ ३ भारतीय खेळाडूंचे नशीब; चमकले तर प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळेल संधी
टी२० विश्वचषक २०२१ मधील पहिली विकेट घेणारा बिलाल खान आहे तरी कोण? अशी राहिलीय कामगिरी