तब्बल वीस वर्ष बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या कोबे ब्रायंन्टला त्याच्या ‘Dear Basketball’ या अँनिमेटेड लघूपटासाठी ऑस्करचे मानांकन मिळाले आहे. हा लघूपट कोबे ब्रायंन्टने २०१५ साली लिहिलेल्या ‘Dear Basketball’ या कवितेवर आधारित आहे.
या सहा मिनिटाच्या लघूपटाचे ऍनिमेशन ऐकेकाळी डिस्नेची धूरा सांभाळलेल्या ग्लेन केंन्स यांनी केले आहे. पाच वेळा अकादमी पुरस्कार जिंकलेले जाँन विलियम्स यांनी या लघूपटाला संगीतबद्ध केले आहे.
कोबे ब्रायंन्ट त्याच्या बास्केटबॉल कारकिर्दीतला शेवटचा सामना एप्रिल २०१६ मधे खेळला होता. त्याच्या सन्मानार्थ लॉस एेंजलस लेकर्स या संघाने त्याचा जर्सी क्रमांक ८ आणि २४ नुकताच निवृत्त केला.
अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट आणि सायन्सने ब्रायंन्टच्या लघूपटाला मानांकन जाहिर केल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘This Is The Realm Of Imagination’ या शब्दात ब्रायंन्टने ट्विट केले. तसेच तो पुढे असे म्हणाला की, “मोशन पिक्चर्स आर्ट आणि सायन्सने माझी दखल घेतल्याबद्दल मी खूश आहे. त्याचबरोबर माझ्या कवितेला इतक्या मोठ्या पातळीवर पोहचविल्या बद्दल मी ग्लेन केंन्स आणि जॉन विलियम्स यांचा ॠणी आहे.
आँस्कर पुरस्कार सोहळा ४ मार्च रोजी हाँलिवूड येथिलडॉल्बी थिएटर येथे पार पडणार आहे.
आशुतोष मासगोंडे
(टीम महा स्पोर्ट्स)