लवकरच भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होत आहे.
या मालिकेतील पहिला सामना १ ऑगस्टपासून बर्मिंघहम येथे सुरु होत आहे.
या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला नवा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
यामध्ये कोहली भारताचा यशस्वी माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकत नवा विक्रम करु शकतो.
इंग्लंड विरुद्धच्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने एक विजय मिळवल्यास, विराट कोहली गांगुलीला मागे टाकत भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान होईल.
माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताचे ४९ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे.
या ४९ कसोटी सामन्यात गांगुलीने भारताला २१ विजय मिळवून दिले आहेत. तर गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १३ सामन्यात पराभूत झाला आहे. तसेच यामधील १५ सामने अनिर्णित राहीले आहेत.
विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधार पदाची सुत्रे २०१५ मध्ये हाती घेतली आहेत.
विराटने २०१५ ते जुलै २०१८ या काळात ३५ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.
या ३५ सामन्यांपैकी भारताने २१ सामन्यात विजय मिळवला आहे. यामध्ये भारताच्या वाट्याला फक्त पाच पराभव आले आहेत. तर ९ सामने अनिर्णित राखण्यात विराट कोहलीचा भारतीय संघ यशस्वी ठरला आहे.
यापूर्वी कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावे आहे.
धोनीने भारताचे सर्वाधिक ६० कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. यामध्ये भारताने २७ सामन्यात विजय आणि १८ सामन्यात पराभव स्विकारले आहेत. तर १५ सामने अनिर्णित राखण्यात भारत यशस्वी झाला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लंडचा सर्वकालीन दिग्गज फलंदाज म्हणतो विराटपासून इंग्लंडला धोका
–कुलदीप नकोच, अश्विनच बेस्ट; ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत