२० वर्षाखालील आईएएएफ जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या हिमा दासवर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
यामध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हिमा दासच्या यशाची दखल घेत ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले.
” हिमा दासचे हे यश अविश्वसनीय आहे. २० वर्षाखालिल अॅथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती पहिली भारतीय हिमा भारताला तुझा गर्व आहे.” या शब्दात विराटने हिमाची सुस्ती केली.
What an incredible achievement for #HimaDas, the first Indian to win a Gold Medal in 400m Sprint at the World Under-20 Championship. The country is so proud of you! 🇮🇳🇮🇳🇮🇳
— Virat Kohli (@imVkohli) July 13, 2018
भारताचा सलामीवीर फलंदाज हिटमॅन रोहित शर्मानेदेखिल ट्विट करत हिमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
“आपल्या देशासाठी सुवर्ण पदक जिकंण्याची हिमाची कामगिरी अविश्वसनीय आहे. हिमाचे हे यश शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे आहे.” आपल्या ट्विटमध्ये याप्रकारे रोहितने हिमाच्या यशाचे कौतुक केले.
Incredible effort from Hima Das for winning gold medal for the country. No words can describe the feelings of this impeccable feat🥇
— Rohit Sharma (@ImRo45) July 13, 2018
तर भारताचा दिग्गज माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण सुद्धा हिमाचे कौतुक करण्यात मागे नव्हता.
“वेग, ग्रिट आणि खेळाबद्दलची भावना. या अविस्मरणीय सुवर्ण पदक विजयासाठी तुझे अभिनंदन. तुझा हा विजय भारतीय अॅथलेटिक्ससाठी ऐतिहासिक दिवस आहे.” असे व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला.
फिनलॅंड येथे आईएएएफ २० वर्षाखालिल जागतिक एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. यामध्ये १८ वर्षीय भारतीय हिमा दासने इतिहास घडविला.
हिमाने महिलांच्या ४०० मिटर रेसमध्ये ५१.४६ सेकंदात अव्वल स्थान पटकावत सुवर्ण पदक जिंकले.
या विजयाबरोबरच ट्रॅक एथलिट खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी हिमा दास पहिली भारतीय ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी
-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार