---Advertisement---

काल सपाटून पराभव झालेल्या विराटचा आज क्रिकेट जगतात या गोष्टीमुळे बोलबाला

On: बुधवार, जानेवारी 15, 2020 3:39 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (15 जानेवारी) 2019 या वर्षाचे सर्वोत्कृष्ट वनडे आणि कसोटी संघ जाहीर केले आहेत. 2019मध्ये विविध संघाच्या क्रिकेटपटूंची कामगिरी बघता त्यांना या संघात स्थान देण्यात आले आहे.

या दोन्ही संघाचे कर्णधारपद भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे विराटला 2017 आणि 2018 या दोन्ही वर्षांच्या आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट वनडे आणि कसोटी संघांचेही कर्णधारपद देण्यात आले होते.

त्यामुळे सलग तीन वर्षे आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे आणि कसोटी या दोन्ही संघांचा कर्णधार म्हणून निवड झालेला विराट हा पहिलाच क्रिकेटपटू आहे. याआधी असा पराक्रम कोणालाही करता आलेला नाही.

असा आहे आयसीसीचा 2019चा सर्वोत्तम वनडे संघ –

रोहित शर्मा, शाय होप, विराट कोहली (कर्णधार), बाबर आजम, केन विलियम्सन, बेन स्टोक्स, जॉस बटलर (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

असा आहे आयसीसीचा 2019चा सर्वोत्तम कसोटी संघ –

मयंक अगरवाल, टॉम लॅथम, मार्नस लॅब्यूशान, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॅटलिंग (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नील वॅगनर, नॅथन लायन.

#आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघाचे कर्णधार –

2004 – रिकी पाँटिंग
2005 – रिकी पाँटिंग
2006 – राहुल द्रविड
2007 – रिकी पाँटिंग
2008 – ग्रॅमी स्मिथ
2009 – एमएस धोनी
2010 – एमएस धोनी
2011 – कुमार संगकारा
2012 – मायकल क्लार्क
2013 – ऍलिस्टर कूक
2014 – अँजेलो मॅथ्यूज
2015 – ऍलिस्टर कूक
2016 – ऍलिस्टर कूक
2017 – विराट कोहली
2018 – विराट कोहली
2019 – विराट कोहली

#आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे संघाचे कर्णधार –

2004 – रिकी पाँटिंग
2005 – मार्वन अटापट्टू
2006 – माहेला जयवर्धने
2007 – रिकी पाँटिंग
2008 – रिकी पाँटिंग
2009 – एमएस धोनी
2010 – रिकी पाँटिंग
2011 – एमएस धोनी
2012 – एमएस धोनी
2013 – एमएस धोनी
2014 – एमएस धोनी
2015 – एबी डिविलियर्स
2016 – विराट कोहली
2017 – विराट कोहली
2018 – विराट कोहली
2019 – विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---