सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये एकदिवसीय सामना खेळला जात आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील हा दुसरा सामना आहे. कोलंबो मैदानावर हा सामना रंगला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमारा संगकाराच्या यादीत स्थान मिळवू शकतो.
विराट कोहली (Virat Kohli) आता अशा यादीत स्थान मिळवू शकतो जिथं फक्त दोनच दिग्गज फलंदाज पोहोचू शकले आहेत. कोहली, सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा दिग्गज कुमारा संगकारा यांच्या यादीत सामील होऊ शकतो. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 293 सामन्यांच्या 281 डावांमध्ये 13,872 धावा आहेत. आणि तो 14,000 पासून 128 धावा दूर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सचिननं 463 सामन्यांच्या 453 डावांमध्ये 18,426 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 44.83 आणि स्ट्राईक रेट 86.23 राहिला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संगकारानं 404 सामन्यांच्या 380 डावांमध्ये 14,234 धावा केल्या आहेत. संगकाराची फलंदाजीची सरासरी 41.98 आणि स्ट्राईक रेट 78.86 राहिला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेन टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) 128 धावा करुन दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका- चरिथ असालंका (कर्णधार) पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला धनाजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे
महत्त्वाच्या बातम्या-
सरफराज खानकडे मुंबई क्रिकेट संघाचं नेतृत्व, एमसीएनं दिली मोठी जबाबदारी
IND VS SL: ‘करो या मरो’ सामन्यात श्रीलंकेनं जिंकला टाॅस, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही तर? आयसीसीचा ‘प्लॅन बी’ तयार