मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी (100th Test) आहे. या सामन्यात चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. परंतु, आपल्या ४५ धावांच्या खेळीदरम्यान त्याने काही नवे विक्रम आपल्या नावे केले.
लसिथने केले त्रिफळाचीत
आपल्या शंभराव्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराटने शानदार सुरुवात केली. हनुमा विहारीसह त्याने अर्धशतकी भागीदारी केली. आपल्या अर्धशतकाकडे आगेकूच करत असताना श्रीलंकेचा युवा फिरकीपटू लसिथ एम्बुलडेनियाने ४५ धावांवर त्याला त्रिफळाचीत केले.
आपल्या या छोट्या खेळीत विराटने ३८ वी धाव घेताना कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा पार केला. त्यासोबत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९०० चौकार पूर्ण केले. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० चेंडू देखील खेळले.
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० चेंडू खेळणारा केवळ तिसरा भारतीय बनला. सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०,८१७ तर राहुल द्रविडने ४६,३३२ चेंडू खेळले होते. या यादीमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत २९,३०५ चेंडूंचा सामना केला होता.
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या आधी १०० कसोटी खेळणारे ११ भारतीय दिग्गज माहित आहेत का? पाहा संपूर्ण यादी (mahasports.in)