---Advertisement---

हार्दिक पंड्या एंगेज्ड झालेला पाहून विराट कोहलीला बसला धक्का, म्हणाला…

On: गुरूवार, जानेवारी 2, 2020 6:13 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. त्याने काल(1 जानेवारी) सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकबरोबर साखरपूडा केला आहे. त्याने तीला एंगेजमेंट रिंग घातलेला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याने या फोटोला ‘मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्तान. 01.01.2020’, असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोवर अनेक क्षेत्रातील सेलिब्रेंटींनी कमेंट केल्या आहेत. तसेच त्याचे आणि नताशाचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्याच्या पोस्टवर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही कमेंट केली असून त्याच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का असल्याचे म्हटले आहे. विराटने कमेंट केली आहे की ‘अभिनंदन हार्दिक. मस्त सरप्राईज आहे. तूम्हाला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.’

Screengrab: Instagram/Hardik Pandya

हार्दिकने नताशाला दुबईमध्ये समुद्राच्या मध्यभागी क्रुजमध्ये गुडघ्यावर बसून प्रपोज केले. तिने हो म्हटल्यानंतर त्याने तिला रिंग घातली.

हार्दिकला त्याच्या एंगेजमेंटनिमित्त विराटसह अनेक क्रिकेटपटूंनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---