शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला वनडे सामन्याने सुरुवात झाली आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
फिंचने विराट कोहलीची स्तुती करताना म्हणाला, विराट वनडे क्रिकेट मधील सर्वोत्तम खेळाडू आहे. फिंच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी विराटच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.
फिंच विराटबद्द्ल बोलताना म्हणाला, “जर तुम्ही विराटची कामगिरी पाहिली, तर तो कोणाच्याही मागे नाही. हे जबरदस्त आहे. आम्हाला डोक्यामध्ये एकच ठेवायला लागेल की, कशाप्रकारे आम्ही त्याला बाद करू शकतो. जेव्हा आपण एखाद्या खेळाडूवर नियंत्रण मिळविण्याचा विचार करतो. तेव्हा त्याला बाद करायचं विसरून जातो आणि आम्हाला असं करायच नाही. विराटच्या फलंदाजीत जास्त उणिवा नाहीत आणि आतापर्यंत तो वनडे क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडू आहे. आम्हाला आमच्या रणनितीवर ठाम रहावे लागेल व त्या अंमलात आणाव्या लागतील.”
वनडेमधील विराटची जबरदस्त कामगिरी
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत आला आहे आणि त्याची कामगिरी याबाबतचा पुरावा देते. विराटने आतापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २४८ वनडे सामन्यात ५९ पेक्षा जास्त सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. यादरम्यान विराटनी ४३ शतके सुद्धा झळकावली आणि त्याला येत्या काही सामन्यात त्याच्याजवळ सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असेल.
रोहितच्या अनुपस्थित विराटवर संघाची आणि फलंदाजीची जबाबदारी असेल
सध्या या दौर्यातून भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा बाहेर आहे. त्याला आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे वनडे आणि टी-२० संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे या दोन मालिकेत फलंदाजीची आणि संघाची दोन्ही जवाबदारी विराटच्या खांद्यावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ गोष्टीमुळे भारतीय संघात आत्मविश्वास; सिडनीत मागील पाचही वनडे सामन्याचा काय आहे निकाल पाहा
जाळ धूर संगटच ! कांगारूकडून भारतीय गोलंदाजांची मनसोक्त धुलाई
“त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही”, रोहितच्या अनुपस्थितीबाबत विराटचे मोठे विधान