रविवारी(22 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सने विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
या सामन्यातील पराभवाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात फलंदाजी करत असताना 5 व्या षटकात धाव घेताना विराटच्या खांद्याचा धक्का दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्यूरान हेन्ड्रिक्सला लागला.
त्यामुळे आयसीसीने विराटला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 नुसार अधिकृत चेतावणी दिली आहे. तसेच त्याला एक डिमिरिट पॉइंट दिला आहे.
आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘विराटने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचार संहितेच्या कलम 2.12 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. हे कलम खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य, पंच, सामनाधिकारी किंवा अन्य सदस्यांशी अयोग्य पद्धितीने शारिरिक संपर्क केल्याबद्दल आहे.’
सप्टेंबर 2016 मध्ये आयसीसीने सुधारित आचारसंहिता लागू झाल्यापासून विराटला हा तिसरा डिमिरिट पॉइंट मिळाला आहे. याआधी त्याला 15 जानेवारी 2018 ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान 1 डिमिरिट पॉइंट मिळाला होता. त्यानंतर 2019 विश्वचषकात 22 जूनला त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर 1 डिमिरिट पॉइंट मिळाला होता.
आता रविवारीच्या सामन्यानंतर त्याला तिसरा डिमिरिट पॉइंट्स मिळाला आहे.
विराटने रविवारच्या सामन्यातील त्याची चूक मान्य केली असून सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुनावलेली शिक्षाही मान्य केली आहे.
JUST IN: Virat Kohli reprimanded for inappropriate physical contact during third 🇮🇳 v 🇿🇦 T20I.#INDvSA https://t.co/ycfZaERCgC
— ICC (@ICC) September 23, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तो एक गोलंदाज ज्याने कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये केले आहे नको नको