---Advertisement---

मेल व्हर्जन ऑल मिराबाई चानू!! वेटलिफ्टिंगचा व्हिडिओ शेअर करताच कोहली भयंकर ट्रोल

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 6:47 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘फिटनेस आयकॉन’ मानले जाते. पण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटले जाते की, जोपर्यंत तुमची बॅट बोलते, तोपर्यंतच तुम्हाला डोक्यावर धरले जाते. भारतीय कर्णधाराच्या बाबतीतही हेच घडत आहे. कोहलीने त्याच्या ट्विटर पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. विराटला पाहून लोकांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूची आठवण झाली आहे.

काही लोकांनी त्याला ‘विराटबाई चानू’ असे म्हणत कमेंट करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी त्याला जिमऐवजी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही दिला.

भारतीय कर्णधार मागील बऱ्याच काळापासून नेहमीच्या लयीत नाही. रनमशीन म्हणून ओळखला जाणाऱ्या कोहलीची बॅट शांत आहे. भारतीय क्रिकेट चाहतेही त्याच्याबद्दल निराश आहेत. विराटच्या या व्हिडिओवर लोकांनी त्याला ट्रोल करण्यामागचे हे प्रमुख कारण आहे.

विराट या व्हिडिओमध्ये वजन उचलताना दिसत आहे. अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काही विराटला ‘विराट बाई चानू’ म्हणत सांगत आहेत. तर काही रोहित शर्माला त्याच्यापेक्षा चांगले म्हणत तुलना करत आहेत. त्याचबरोबर बहुतेक लोक त्याच्या खराब फलंदाजीवर टीका करत आहेत. लोकांनी विराटला जिममध्ये अधिक वेळ घालवण्यापेक्षा फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही दिला आहे.

विराटने या व्हिडिओच्या कॅप्शन लिहिले आहे की, ‘मेहनतीला पर्याय नाही.’

भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेल याने देखील टिप्पणी केली आहे. विराटच्या या व्हिडिओवर टिप्पणी करताना पटेलने लिहिले की, ‘मेहनतीला पर्याय नाही. शतकाची वाट पाहत आहे.’

महत्वाची बाब म्हणजे, भारतीय कर्णधाराची बॅट गेल्या अनेक दिवसांपासून शांत आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, एका क्षणी सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षापासून एकही शतक आलेले नाही. त्याचबरोबर, विराट कोहली सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही. तो नॉटिंगहॅम कसोटीतही गोल्डन डकचा बळी ठरला. प्रत्येक चाहत्याला भारतीय कर्णधाराकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि याच कारणामुळे त्याला त्याच्या या व्हिडिओवर फलंदाजीचा सल्ला दिला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टॉस जिंकल्याने कर्णधार कोहली शॉक; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अँडरसनने ओलांडली ‘द वॉल’! द्रविडला मागे सोडत केला ‘हा’ विक्रम

कारकिर्दीत केवळ चौथ्यांदा विराटने घेतला ‘हा’ निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---