---Advertisement---

PBKS vs RCB: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर विराट! ‘ही’ कामगिरी करताच ठरेल आशियातील सर्वात महान खेळाडू

On: मंगळवार, जून 3, 2025 3:41 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स दोन्ही संघात खेळला जाणार आहे (IPL final RCB vs PBKS). दोन्ही संघ पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ येऊन पोहोचले आहेत आणि दोन्ही संघ ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. चाहत्यांना आतुरतेने या अंतिम सामन्याच्या क्षणाची प्रतीक्षा आहे. आरसीबी (RCB) चौथ्या वेळेस अंतिम सामन्यात पोहोचली आहे, तसेच पंजाब किंग्स (Punjab kings) दुसऱ्यांना फायनलमध्ये पोहोचली आहे. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहेत. विराट कोहली या सामन्यात एक असा विक्रम करण्याच्या जवळ आहे, ज्यामुळे तो आशियातील सर्वात मोठा खेळाडू ठरेल.

आता फायनल सामन्यात विराट कोहलीने 72 धावा केल्या, तर तो टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शोएब मलिकच्या पुढे जाईल. असे करताच विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये आशियातील सर्वात मोठा फलंदाज ठरेल. शोएब मलिकने 13571 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत जर विराट 72 धावा करू शकला तर तो आशियाई फलंदाजांमध्ये सर्वात जास्त टी20 धावा करणारा फलंदाज ठरेल.

कोहलीने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये तीन अंतिम सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32 च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत. 2009 च्या अंतिम सामन्यात कोहली डेक्कन चार्जर्स यांच्याविरुद्ध 7 धावा करू शकला होता. तसेच 2011 मध्ये चेन्नई विरुद्ध विराटने आयपीएलच्या फायनलमध्ये 35 धावा तसेच 2016 मध्ये हैदराबाद विरुद्ध सामन्यात 54 धावा केल्या होत्या.

विराट कोहली (virat kohli) अंतिम सामन्यात जर एक चौकार मारण्यात यशस्वी झाला, तर तो आयपीएल इतिहासात सर्वात जास्त चौकार झळकावणारा फलंदाज ठरेल. कोहलीने आतापर्यंत 258 डावांमध्ये 768 चौकार झळकावले आहेत. सध्या कोहली आणि शिखर धवन बरोबर आहेत. धवनने आयपीएल 222 सामन्यांच्या 221 डावांमध्ये 768 चौकार झळकावले आहेत, तसेच जर विराटने एक चौकार जास्त ठोकला, तर तो सर्वात जास्त चौकार झळकावणाऱ्या फलंदाजांपैकी एक असेल.

या हंगामात विराटने शानदार फलंदाजी केली आहे, त्याने 14 सामन्यात 614 धावा केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत 8 अर्धशतके देखील झळकावली आहेत. जे की आयपीएल 2025 मध्ये कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त आहेत. आता चाहत्यांना फायनल सामन्यात विराटकडून अधिक चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---