पुणे (18 मार्च 2024) – आजच्या दिवसाचा तिसरा सामना कोल्हापूर विरुद्ध धाराशिव संघ यांच्यात झाला. दुपार सत्रातील 2 सामने पुढील 4 दिवस संध्याकाळ खेळवले जाणार आहेत. कोल्हापूर संघ प्रमोशन फेरीत पोहचला होता तर धाराशिव संघ प्रमोशन फेरीतून बाहेर पडला होता. कोल्हापूर संघाने आक्रमक पवित्रा घेत गुण मिळवले. कोल्हापूरच्या चंद्रकांत जगताप व सौरभ फगारे यांनी जोरदार खेळ करत संघाला आघाडी मिळवून दिली.
कोल्हापूर संघाने उत्कृष्ट खेळ करत धाराशिव संघाला मध्यांतरापुर्वी 3 वेळा ऑल आऊट करत सामना एकतर्फी केला. मध्यांतराला कोल्हापूर संघाने 35-06 अशी आघाडी घेतली होती. कोल्हापूर संघाकडून चंद्रकांत जगताप ने सुपर टेन पूर्ण केला. मध्यंतरा नंतर ही कोल्हापूर ने आपला आक्रमक प्रवित्रा कायम ठेवत आघाडी वाढवली.
कोल्हापूर संघाने 61-18 असा विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. कोल्हापूर संघाने 5 वेळ धाराशिव संघाला ऑल आऊट केले. कोल्हापूर कडून चंद्रकांत जगताप ने सर्वाधिक 16 गुण मिळवले. सौरभ फगारे ने 5 गुण मिळवले. तर बचावत साईप्रसाद पाटील ने पकडीत एकूण 8 गुण मिळवले. तर दादासो पूजारी ने 5 पकडी केल्या. (Kolhapur team top in ‘B’ group in Yuva Kabaddi series)
बेस्ट रेडर- चंद्रकांत जगताप, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- साईप्रसाद पाटील, कोल्हापूर
कबड्डी का कमाल- अभिषेक थोडसरे, धाराशिव
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । रोहितसाठी भावूक चाहत्यांबाबत हार्दिकचं मोठं विधान; म्हणाला, ‘…लक्ष देत नाही’
टाइम आउटला उत्तर देत बांगलादेशचे ‘ब्रोकन हेलमेट’ सेलिब्रेशन, मुशफिकूरने उटवली मॅथ्यूजची खिल्ली