fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल जिंकण्याच्या केकेआरच्या शक्यता वाढल्या, कारणही आहे तसंच खास

September 22, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


मुंबई । आयपीएल 2020 ला सुरुवात झाली आहे.  शनिवारी अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला.  त्यानंतर मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरशी होईल.  कोलकाताचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या म्हणण्यानुसार, फलंदाजीच्या क्रमवारीत आंद्रे रसेलला संघ प्रमोट करू शकतो. या निर्णयाबाबत मॅक्क्युलम कर्णधार इयॉन मॉर्गनची मदत घेऊ इच्छितो.

माध्यमांशी बोलताना मॅक्युलम म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे एक मजबूत संघ आहे. आम्ही सामन्यानुसार आमच्या पर्यायांचा चांगला उपयोग करू. रसेलने मागील हंगामात 50 हून अधिक षटकार ठोकले आहेत. रसेलचा खेळ हा कायम टी 20 क्रिकेटमधील अखेरच्या 10 षटकांसारखा आहे. अखेरच्या 10 षटकांत रसेल सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतो. त्यामुळे त्याला अव्वल क्रमाकावर खेळवता येईल. आम्हाला रसेलशिवाय फटकेबाजी करणार्‍या खेळाडूंचे आणखी पर्याय हवे आहेत.”

मॅक्कलमच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या आगमनाने मध्य फलंदाजी बळकट झाली आहे. नेतृत्त्वासंबंधी मॅक्क्युलम म्हणाले की, “मॉर्गनने विश्वचषक जिंकला आहे आणि तो इंग्लंडचा महान कर्णधार आहे, दिनेश कार्तिकचादेखील दीर्घ अनुभव आहे, आम्हाला नेतृत्वात मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांची मदत होईल”.

रसेल, कार्तिक आणि मॉर्गनची आयपीएल कारकिर्द

रसेलने आतापर्यंत 64 सामने खेळले असून 186.41 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार  400 धावा केल्या असून त्यामध्ये 96 चौकार आणि 120  षटकारांचा समावेश आहे. रसेलने आतापर्यंत 8 अर्धशतके ठोकली आहेत.  मॉर्गनने आयपीएल कारकीर्दीत 52 सामने खेळला असून त्याने 121.13 च्या स्ट्राइक रेटने 854 धावा केल्या असून त्यामध्ये त्याने 72 चौकार आणि 34 षटकार ठोकले आहेत. कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत 182 सामने खेळले आहेत आणि 129.8 च्या स्ट्राइक रेटने 3 हजार 654 धावा केल्या आहेत.  कार्तिकने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत 357 चौकार आणि 101 षटकार ठोकले आहेत, कार्तिक अद्याप शतक झळकवू शकला नाही पण त्याने 18 शानदार अर्धशतके झळकावली आहेत.

 


Previous Post

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची ‘ही’ आहेत ५ कारणे, घ्या जाणून…

Next Post

असा फॅन कधी पाहिलाही नसेल! टीव्हीसमोरच ‘या’ खेळाडूची केली आरती

Related Posts

Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

असा फॅन कधी पाहिलाही नसेल! टीव्हीसमोरच 'या' खेळाडूची केली आरती

Photo Courtesy: www.iplt20.com

कोहलीला बाद करणे क्रिकेटरच्या पडले पथ्यावर, दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

Photo Courtesy: Twitter/ICC

१९९२ क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे मार्टिन क्रो

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.