आयपीएल 2024 साठी आता संघांची तयारी सुरू झालेली आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी मागील दोन वर्षापासून मेंटर म्हणून काम करणाऱ्या गौतम गंभीर याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी लगेच कोलकाता नाईट रायडर्स संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. केकेआरने ट्विट करत याबाबतची अधिकृत घोषणा केली.
Welcome home, mentor @GautamGambhir! 🤗
Full story: https://t.co/K9wduztfHg#AmiKKR pic.twitter.com/inOX9HFtTT
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 22, 2023
गौतम गंभीर हा 2022 व 2023 या दोन हंगामासाठी लखनऊ संघाचा मेंटर होता. त्याच्या मार्गदर्शनात संघाने दोन्ही वेळा प्ले ऑफ्सपर्यंत मजल मारली. मात्र संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले होते. त्यानंतर गंभीर पुढील हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
केकेआरचा मागील हंगामातील कर्णधार नितीश राणा तसेच संघाचा मालक शाहरुख खान हे गंभीरला पुन्हा केकेआरकडे आणण्यास उत्सुक होते. शाहरुख व गंभीर यांची यासंदर्भात एक बैठक देखील झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आता हा निर्णय झालेला आहे. गंभीर 2011 ते 2017 अशी सलग सात वर्ष केकेआर संघाचा कर्णधार होता. त्याच्याच नेतृत्वात केकेआर ने 2012 व 2014 मध्ये विजेतेपद जिंकलेले.
दरम्यान लखनऊ संघासोबत आपले नाते तोडताना त्याने एक भावनिक संदेश लिहला. लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांचे आभार मानले. तसेच, भविष्यात संघाला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
(Kolkata Knight Appointed Gautam Gambhir As Mentor For IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…