---Advertisement---

आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…

---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर श्रीलंका सरकारने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. राजकीय हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित केले होते. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटचे भवितव्य अंधारमय झाले होते. आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही देशाचे सरकार हे क्रिकेट बोर्डामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर श्रीलंकन सरकारने तातडीने संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते ‌ श्रीलंका संघ साखळी फेरीतून बाहेर पडल्यानंतर आयसीसीने देखील आपल्या नियमानुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डावर कारवाई केली. त्यानुसार श्रीलंका क्रिकेट बोर्ड कोणत्याही आयसीसीच्या स्पर्धेमध्ये तसेच द्विपक्षीय मालिकांमध्ये सहभागी होऊ शकत नव्हता. मात्र, आता आयसीसीने आपला निर्णय बदलला आहे.

आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला द्विपक्षीय मालिका व आयसीसीच्या स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली आहे. मात्र, क्रिकेट बोर्डाला मिळणाऱ्या निधीवर पूर्णपणे आयसीसीची पकड असेल. तसेच आयसीसीने एक मोठा निर्णय घेत पुढील वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेत होणाऱ्या अंडर 19 क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतले आहे. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली जाईल.

मागील काही काळापासून श्रीलंका क्रिकेट बोर्ड सातत्याने चर्चेत आहे. मागील वर्षी टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्यात त्यांना अपयश आलेले. ते वनडे विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले नव्हते. तर विश्वचषकात देखील त्यांची कामगिरी खराब राहिली व त्यांना नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे 2025 चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत त्यांना खेळता येणार नाही.

(ICC confirms Sri Lanka can play in bilateral and ICC events)

हेही वाचा-
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढणार! 2 माजी दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा कोण आहेत ते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---