रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अखेरचा साखळी सामना खेळला गेला. या सामन्यात भारत विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने होते. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 160 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा भारताचा सलग नववा विजय ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या सामन्यात अर्धशतक झळकावत खास पराक्रम केला. हे दोघेही साखळी फेरीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 फलंदाजांच्या यादीत सामील झाले. विशेष म्हणजे, विराटने अव्वलस्थान काबीज केले. चला तर, खेळाडूंची यादी पाहूयात…
विश्वचषक 2023मध्ये साखळी फेरीनंतर सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
5. डेविड वॉर्नर
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आहे. त्याने 9 सामन्यात 55.44च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. 163 ही वॉर्नरची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे.
4. रोहित शर्मा
‘हिटमॅन’ नावाने ओळखला जाणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत चौथ्या स्थानी आहे. रोहितने महत्त्वाच्या क्षणी संघासाठी विस्फोटक फलंदाजी करत विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने 9 सामन्यात फलंदाजी करताना 55.88च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. तो विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. रोहितने या धावा करताना 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. 131 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
3. रचिन रवींद्र
अवघ्या 23व्या वर्षी संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेणारा फलंदाज म्हणजे न्यूझीलंडचा रचिन रवींद्र (Rachin Ravindra) होय. त्याने 9 सामने खेळताना 70.62च्या सरासरीने 565 धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने या धावा करताना 2 अर्धशतके आणि 3 शतके ठोकली आहेत. नाबाद 123 ही रचिनची सर्वोत्तम खेळी आहे.
2. क्विंटन डी कॉक
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 9 सामन्यात 65.66च्या सरासरीने 591 धावा केल्या आहेत. डी कॉकने स्पर्धेत सर्वाधिक 4 शतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, त्याने एकही अर्धशतक केले नाहीये. 174 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे.
Look who's on top 👀👑✅
And all five are set to feature in the #CWC23 semi-finals 🤯
More #CWC23 stats 🔢 https://t.co/nLlLIqdPDT pic.twitter.com/Y86kRxYe6l
— ICC (@ICC) November 13, 2023
1. विराट कोहली
विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वर्चस्व असणारा फलंदाज इतर कुणी नसून विराट कोहली (Virat Kohli) आहे. त्याने 9 सामन्यात 99च्या सरासरीने सर्वाधिक 594 धावा केल्या आहेत. विराटने या धावा करताना 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 103 ही विराटची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे. (top 5 players who scorer Most runs after league stages cwc 2023)
हेही वाचा-
फुल टाईम बॉलर नाही, पण बॉलिंग कशी करायची विसरला नाही रोहित; एक दशकानंतर काढला फलंदाजाचा काटा
गरज नसताना गोलंदाजांनी कशाला टाकले वाईड यॉर्कर? सामन्यानंतर रोहितचा सर्वात मोठा खुलासा, वाचा प्लॅन