वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. या फेरीचा अखेरचा सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने तब्बल 160 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा भारताचा स्पर्धेतील सलग नववा विजय होता. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच खुश दिसला. त्याने म्हटले की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर स्पर्धेबाबत कधीच पुढचा विचार नाही केला.”
काय म्हणाला रोहित?
‘हिटमॅन’ (Hitman) नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही पुढचा विचार करू शकत नाहीत. सर्वकाही योग्य राहिले, तर 11 सामने खेळायला मिळतील. त्यामुळे एका वेळी एकाच सामन्याचा विचार करणे योग्य असल्याचे दिसते. स्पर्धेत आम्ही आतापर्यंत ज्याप्रकारे प्रदर्शन केले आहे, ते खूपच कमालीचे आहे.”
पुढे बोलताना रोहित असेही म्हणाला, “प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता खेळाडू नव्याने पुढे आला आहे आणि स्वत:वर जबाबदारी घेतली आहे. येथील परिस्थिती आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे, पण कधीही वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळणे सोपे नसते.” ड्रेसिंग रूममधील स्थितीविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “ड्रेसिंग रूमचा माहोल चांगला बनवण्यासाठी चांगल्या निकालाची गरज असते, पण आम्ही प्रयत्न केला आहे की, माहोल साधारणच राहील. प्रत्येक खेळाडूंमध्ये चांगले नाते आहे.”
https://twitter.com/BCCI/status/1723733651849183305?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1723733651849183305%7Ctwgr%5E06e37eedac6fddd12314807a177def7e11a8729f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Frohit-sharma-india-won-by-160-runs-india-vs-netherlands-odi-world-cup-2023%2F437869%2F
वाईड यॉर्कर का टाकले?
या सामन्यात वाईड यॉर्कर टाकण्याची गरज नव्हती, तरीही खेळाडूंनी ते टाकले, याविषयी बोलताना रोहित म्हणाला, “नेदरलँड्सविरुद्ध अनेक गोलंदाजांनी गोलंदाजी केली. आमच्या डोक्यात सहाव्या गोलंदाजाचा विचार सुरू होता. गोलंदाजी विभाग म्हणून आम्ही अनेक गोष्टी आजमावल्या. सामन्यादरम्यान आम्हाला वाईड यॉर्कर टाकण्याची गरज नव्हती, पण आम्ही ते टाकले. ही भविष्यातील योजना आहे.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 410 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला 47.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 250 धावाच करता आल्या. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर याने 94 चेंडूत नाबाद 128 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये 5 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (captain rohit sharma india won by 160 runs india vs netherlands odi world cup 2023)
हेही वाचा-
9 पैकी 9 विजय मिळवल्यानंतर बोलला रोहित, म्हणाला, “वर्ल्डकप सुरू झाला तेव्हापासूनच…”
वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया अजिंक्यच! नेदरलँड्सविरूद्धही उडवला विजयचा बार