भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात रविवारी (12 नोव्हेंबर) नेदरलँड्सविरुद्ध विक्रमांचे मनोरे रचले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात रोहितने कर्णधार म्हणून देखील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
अखेरच्या साखळी सामन्यात रोहित शर्मा आपल्या शानदार फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने आक्रमक सुरुवात करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याने बाद होण्यापूर्वी 54 चेंडू मध्ये 61 धावा केल्या. यामध्ये आठ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. याच खेळी दरम्यान कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.
रोहितच्या नावे या विश्वचषकात आत्तापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 503 धावा जमा झाल्या आहेत. त्याने सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला. गांगुली याने 2003 विश्वचषकात 465 धावा केल्या होत्या. तर मागील विश्वचषकात विराट कोहली याने 443 धावांचा टप्पा पार केलेला.
यासोबतच रोहित एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत देखील पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये न्यूझीलंडचा केन विलियम्सन पहिल्या क्रमांकावर असून त्याने मागील विश्वचषकात 578 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माहेला जयवर्धने असून त्याने 2007 विश्वचषकात 548 धावांपर्यंत मजल मारलेली.
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार
503 – रोहित शर्मा (2023)*
465– सौरव गांगुली (2003)
443– विराट कोहली (2019)
332– मोहम्मद अझरूद्दीन (1992)
(Rohit Sharma Becomes First Indian Captain Who Scored 500 Runs In ODI World Cup)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल