---Advertisement---

IPL 2024 : केएल राहुल कर्णधार, अन् पूरन उपकर्णधार, पाहा लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग 11

Lucknow-Super-Giants
---Advertisement---

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सबरोबर (Gujrat Titance) लखनऊ सुपर जायंट्सने एन्ट्री केली होती. तर पहिल्या दोन हंगामात लखनऊने प्लेऑफमध्ये जागा पटकावली. पण जेतेपदापासून दोन पावलं दूरच राहिले. आत सतराव्या हंगामाआधी लखनऊने आपल्या कोचिंग स्टाफमध्येच बदल केला आहे. त्यामुळे नव्या हंगामात लखनऊचा चेहरा-मेहरा बदलला आहे. नव्या इराद्याने लखनऊ संघ आयपीएलच्या (IPL 2024) मैदानात उतरणार आहे. गेल्या हंगामात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण या हंगामात तो खेळण्याची शक्यता आहे. 

याबरोबरच, या हंगमात लखनऊने उपकर्णधारही बदलला आहे. गेल्या दोन हंगामात ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) संघाचा उपकर्णधार होता. पण या हंगामात वेस्टइंडिजचा माजी कर्णधार आणि डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनवर (Nicholas Pooran) ही जबाबदारी सोपवण्यात आला आहे. तसेच पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा संघ कोणत्या 11 खेळाडूंसोबत खेळणार हे आज आपण बघणार आहोत.

अशातच IPL 2024 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने  19 डिसेंबर रोजी दुबई येथे झालेल्या लिलावात संघात 6 खेळाडूंचा समावेश केला होता. यामध्ये त्याने सर्वात महागडा खेळाडू शिवम मावी याला 6.4 कोटींना खरेदी केले होते. त्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीला 2 कोटींना विकत घेतले होते. याशिवाय मोहम्मद अर्शद खान, ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ आणि मार्क वुडच्या जागेवर वेस्ट इंडिजचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज शामर जोसेफचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आयपीएलच्या 17व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स समोर मोठे अव्हान असणार आहे. कारण चार परदेशी खेळाडू कोणते खेळवायचे यामध्ये लखनौच्या संघात शामर जोसेफ, विड विली, काइल मेयर्स, नवीन-उल-हक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (उपकर्णधार) यांपैकी कोणत्याही चार परदेशी खेळाडूंची निवड करणे आव्हानापेक्षा कमी असणार नाही. तर प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल कोणाला खेळवणार आणि नंतर कोणाला संधी देणार हे बघावे लागणार आहे.

दरम्यान, परदेशी खेळाडूंशिवाय केएल राहुलसमोर भारतीय खेळाडूंची निवड करण्याचे मोठे आव्हान असेल. तसेच, कागदावर लखनौ सुपर जायंट्सचा संघ खूप मजबूत दिसत आहे, परंतु 25 खेळाडूंच्या संघातील 11 खेळाडू कोण असतील हे पाहणे बाकी आहे ज्यांना 24 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.

आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग 11- क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स,केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या,रवी बिश्नोई, शिवम मावी, मोहसीन खान.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---