---Advertisement---

शुभमंगल.! प्रेयसीने टाकलेल्या गुगलीवर पडली फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची विकेट; विवाहाचे फोटो व्हायरल

On: शनिवार, डिसेंबर 12, 2020 7:08 PM
---Advertisement---

जगप्रसिद्ध अशा आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती लग्नबंधनात अडकला आहे. ‘मिस्ट्री स्पिनर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या चक्रवर्तीने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
कित्येक वर्षे आपल्या प्रेयसीला डेट केल्यानंतर चक्रवर्तीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सर्व रिती-रिवाजांसह त्याने चेन्नई येथे जवळच्या व्यक्तींच्या उपस्थित पारंपारिक पद्धतीने लग्न केले आहे. चक्रवर्तीचा मित्र व प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अरुण कार्तिक याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे. कित्येकांनी चक्रवर्तीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CIpdFdLDNY9/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CIpfuUZBW1N/?utm_source=ig_web_button_share_sheet

चक्रवर्तीची झाली होती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड 
आयपीएल २०२०मध्ये चक्रवर्तीने दमदार गोलंदाजी प्रदर्शन केले. या हंगामात त्याने एकूण १४ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या. यात त्याच्या २० धावांवर ५ विकेट्सच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे. त्याच्या या कमालीच्या प्रदर्शनाला पाहता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी देण्यात आली होती. तो भारतीय टी२० संघाचा भाग होता. परंतु, दुखापतीमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाचे स्वप्न अधुरे राहिले. त्याच्या जागी टी२० संघात टी नटराजन याला स्थान देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

चेंडू लपवा आणि पळा! बिग बॅश लीग सामन्यादरम्यान घडली मजेशीर घटना, पाहा व्हिडिओ

NZvsWI 2nd Test: न्यूझीलंडच्या अष्टपैलू प्रदर्शनाने वेस्ट इंडिज संकटात, दुसऱ्या दिवसाखेर ३३६ धावांनी पिछाडीवर

Ind vs Aus A: शुभमन गिलचे दमदार अर्धशतक, दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---