रविवारी (21 एप्रिल) खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात केकेआरनं आरसीबीचा 1 धावेनं पराभव केला. बंगळुरूचा चालू हंगामातील हा सातवा पराभव आहे.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 2022 मध्ये शेवटची प्लेऑफ फेरी गाठली होती. गेल्या वर्षी 2023 मध्ये बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती. आता आयपीएल 2024 मध्येही संघाची अवस्था बिकट झाली आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाल बंगळुरूनं चालू मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये फक्त 1 विजय नोंदवला आहे. आरसीबीचे सध्या 2 गुण आहेत आणि संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
इथून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं उर्वरित सर्व 6 सामने जिंकले तरी ते प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी जर-तर च्या स्थितीत अडकलेले असतील. बंगळुरूसाठी ही काही नवीन गोष्ट नाही. आयपीएल 2023 मध्येही टीम अशाच चक्रात अडकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल 2024 मध्ये एकमेव विजय पंजाब किंग्जविरुद्ध मिळवला. त्यांनी तो सामना ४ विकेटनं जिंकला होता. त्यानंतर आरसीबीला दोनदा कोलकाता आणि एकदा हैदराबाद, लखनऊ, राजस्थान आणि मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलाय.
आयपीएल 2019 मध्ये आरसीबीनं सलग 7 सामने गमावले होते. आता संघ त्या लज्जास्पद विक्रमाच्या जवळ पोहचला आहे. या हंगामात आरसीबीनं आतापर्यंत सलग 6 सामने गमावले आहेत. जर आरसीबीनं येथून उर्वरित सर्व 6 सामने जिंकले तर त्यांचे 14 गुण होतील. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचे 7 सामन्यांत 12 गुण आहेत. इतर संघही त्यांच्या फारसे मागे नाहीत. अशा स्थितीत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या बंगळुरूच्या आशा जवळपास संपल्या आहेत.
गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सल या संघांनाही या हंगामात चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं असलं तरी त्यांनी स्वत:ला प्लेऑफच्या शर्यतीत कसंतरी कायम ठेवलं आहे. आरसीबी व्यतिरिक्त आयपीएल 2024 मध्ये असा कोणताही संघ नाही ज्यानं सलग 5 किंवा अधिक सामने गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका रननं पराभव, केकेआरनं शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय
बाद की नाबाद? आऊट दिल्यानंतर अंपायरवरच भडकला विराट कोहली, नो-बॉलवरून मोठा राडा!