---Advertisement---

रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका रननं पराभव, केकेआरनं शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 धावेनं पराभव केला. रविवारी (21 एप्रिल) ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीसमोर विजयासाठी 223 धावांचं लक्ष्य होतं. परंतु संपूर्ण संघ 20 षटकांत 222 धावांच करू शकला.

आरसीबीला विजयासाठी शेवटच्या षटकात 21 धावा करायच्या होत्या. मिशेल स्टार्कच्या या षटकात कर्ण शर्मानं तीन षटकार ठोकले. मात्र, पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. आता आरसीबीला एका चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या. परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात लॉकी फर्ग्युसन धावबाद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. 35 धावांवर विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी करत आरसीबीला सामन्यात परतवलं. जॅक्स आणि पाटीदार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी झाली. जॅक्सनं 32 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 55 धावा केल्या. तर पाटीदारनं केवळ 23 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पाटीदारनं आपल्या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकार लगावले.

तत्पूर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनं सहा गडी गमावून 222 धावा केल्या. सलामीवीर फिल सॉल्टनं अवघ्या 14 चेंडूंत 7 चौकार आणि तीन षटकारांसह 48 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरनं 36 चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या. श्रेयसनं आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला.

रमणदीप सिंगनं 9 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 24 धावांची नाबाद खेळी केली. आंद्रे रसेलनंही 20 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. आरसीबीकडून यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कोलकाता नाईट रायडर्सनं या हंगामात तिसऱ्यांदा 220 हून अधिक धावा केल्या होत्या.

या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्यांनी 7 सामन्यांमध्ये 5 विजय मिळवले असून दोन सामन्यांत पराभवाचा सामना केलाय. तर आरसीबी 8 सामन्यांमध्ये 7 पराभवानंतर गुणतालिकेत तळाशी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

गुजरातविरुद्ध पंजाबनं जिंकला टॉस, प्रथम फलंदाजी करणार; टीममध्ये काय बदल, जाणून घ्या

बाद की नाबाद? आऊट दिल्यानंतर अंपायरवरच भडकला विराट कोहली, नो-बॉलवरून मोठा राडा!

कॅच ऑफ द टूर्नामेंट! कॅमरुन ग्रीननं हवेत उडी मारून एका हातानं घेतला अविश्वसनीय झेल, तुम्ही VIDEO पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---