---Advertisement---

टॉस जिंकत केकेआरचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघ नव्या कर्णधारासह उतरणार मैदानात

On: शनिवार, एप्रिल 1, 2023 3:16 PM
Shikhar-Dhawan-And-Nitish-Rana
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून थाटात सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना गुजरातने 5 विकेट्सने जिंकत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. यानंतर स्पर्धेत 1 एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना 3.30 वाजता मोहाली येथे पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. त्यानंतर 7.30 वाजता लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात स्पर्धेचा तिसरा सामना खेळला जाणार आहे. त्यापूर्वी दुसऱ्या सामन्याची नाणेफेक 3 वाजता झाली. ही नाणेफेक कोलकाता संघाने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आय एस बिंद्रा स्टेडिअमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ नव्या कर्णधारासह उतरणार आहेत. पंजाबचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे आहे, तर कोलकाताचे नेतृत्व नितीश राणा (Nitish Rana) याच्याकडे आहे. नाणेफेकीवेळी धवन म्हणाला की, “या सामन्यात चार परदेशी खेळाडूंसह उतरणार आहे. त्यात भानुका राजपक्षे, नेथन एलिस आणि सॅम करन आहेत. मात्र, चौथ्या खेळाडूचे नाव लक्षात नाहीये.” आता दुसरा सामन्यात विजय मिळवण्याचा या दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. (Kolkata Knight Riders won the Toss and opt to bowl first against Punjab Kings ipl 2023)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्स
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, नेथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

कोलकाता नाईट रायडर्स
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मनदीप सिंग, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, टीम साऊदी, अनुकूल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनची दुखापत गंभीर, पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का
हेड-टू-हेड आकडेवारी, संभावित प्लेइंग 11 आणि मॅच प्रेडिक्शन, जाणून घ्या पंजाब-केकेआरच्या सामन्याविषीय सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---