कोलकाता। बुधवारी (२५ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात एलिमिनेटरचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला. इडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने १४ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात एक मजेशीर घटना पाहायला मिळाली.
चाहत्याने घेतली मैदानात एन्ट्री
या सामन्यात अखेरच्या तीन चेंडूत लखनऊला १६ धावांची गरज होती. याचवेळी एक चाहता (a pitch invader) सुरक्षा तोडत मैदानात घुसला. त्यावेळी तो चाहता लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) भेटण्याच्या प्रयत्नात त्याच्या दिशेने धावत होता. पण कोलकाताच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला पकडत थेट खांद्यावर टाकले आणि त्याला मैदानातून बाहेर घेऊन गेला.
पोलीस कर्मचारी ज्याप्रकारे चाहत्याला मैदानातून बाहेर घेऊन गेला. ते पाहून विराट देखील आश्चर्यचकीत झाला. तसेच त्याला हसूही आवरले नाही. पण या चाहत्यामुळे सामन्यात काहीवेळ व्यत्यय आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच चाहत्याने अशी मैदानात घुसण्याही ही पहिली वेळ नाही. याच आयपीएल हंगामात यापूर्वीही रोहित शर्मा, एमएस धोनी यांना भेटण्यासाठी चाहत्यांनी सुरक्षा तोडत मैदानात प्रवेश केला होता.
दरम्यान, एलिमिनेटर (Eliminator) चाहत्याला बाहेर नेल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यावर अखेरच्या तीन चेंडूत बेंगलोरचा गोलंदाज हर्षल पटेलने चांगली गोलंदाजी करताना लखनऊला एकच धाव दिली. त्यामुळे बेंगलोरने हा सामना जिंकला.
https://twitter.com/ZlxComfort/status/1529709824216248321
When the intruder towards Virat Kohli at Eden Gardens – VK couldn't control his laugh seeing policeman's reaction 😂 pic.twitter.com/Ctvw8fU4uy
— sohom (@AwaaraHoon) May 26, 2022
या सामन्यात (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) बेंगलोरकडून रजत पाटीदारने शतकी खेळी करताना ११२ धावा केल्या. त्याने या खेळीत १२ चौकार आणि ७ षटकार खेचले. त्यामुळे बेंगलोरला २० षटकांत ४ बाद २०७ धावा करता आल्या. त्यानंतर लखनऊकडून केएल राहुलने सर्वाधिक ७९ धावा केल्या, तसेच दीपक हुडा यानेही ४५ धावांची खेळी केली. पण त्यांना लखनऊला विजय मिळवून देण्यात अपयश आले. लखनऊने २० षटकांत ६ बाद १९३ धावा केल्या. बेंगलोरकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
आता बेंगलोरला क्वालिफायर दोनचा सामना शुक्रवारी (२७ मे) राजस्थान रॉयल्सविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
गेम! एका भारतीय क्रिकेटरने ठरवून पाकिस्तानी खेळाडूला जिंकू दिली नव्हती ऑडी कार
चहलला खुणावतायेत मोठे विक्रम! बेंगलोरविरुद्ध कमाल करत मलिंगा, बुमराहलाही ठरू शकतो वरचढ