कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर लोकांचा संताप सातत्याने वाढत आहे. देशाच्या विविध शहरात सातत्याने हिंसक आंदोलने होत आहेत. या बलात्कार-हत्या प्रकरणावर विविध सेलिब्रिटींची वक्तव्ये येत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ट्विटरवरून आपला प्रोफाईल फोटो काढून तो ब्लॅक (काळा) केला आहे. तसेच, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – नवीन प्रोफाइल फोटो… याशिवाय, सौरव गांगुलीने काहीही लिहिलेले नाही, परंतु ते कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाशी जोडले जात आहे. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ माजी भारतीय कर्णधाराने आपला प्रोफाईल फोटो ब्लॅक (काळ) केला आहे.
सौरव गांगुलीचा प्रोफाईल फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. ज्यावर मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. सौरव गांगुलीशिवाय मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आणि सुर्यकुमार यादव यांनी बलात्कार-हत्या प्रकरणावर आवाज उठवला आहे.
#NewProfilePic pic.twitter.com/WiHJwDf6z1
— Sourav Ganguly (@SGanguly99) August 19, 2024
अलीकडेच सौरव गांगुली मीडियाशी बोलताना म्हणाला होता की, ही खूप भयानक गोष्ट आहे. आता सीबीआय आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे काही घडले ते अत्यंत लज्जास्पद आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला दोषी आढळल्यास त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मला अपेक्षा आहे. शिक्षा अशी असावी की आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याचे धाडस कोणी करू नये. शिक्षा कठोर असणं महत्त्वाचं आहे.
वास्तविक आता, कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. शुक्रवारी सीबीआयने या प्रकरणी आपले म्हणणे मांडले. सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही किमान 30 संशयितांची ओळख पटवली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा-
दुलीप ट्राॅफीमध्ये रिंकूला का नाही मिळाली संधी? स्वत:च केला मोठा खुलासा
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात परतणार शमी? जय शहा म्हणाले…
रिंकू सिंगनंतर केकेआरच्या ‘या’ खेळाडूने आरसीबीकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा