पुणे। नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे आयोजित सहाव्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत अनुराग कोंकर, राधा कौसदीकर, सुखदेव सिंग, अँजेला पंत, तन्मया करमरकर या धावपटूंनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
तसेच, 5कि.मी, 10कि.मी, आणि 21कि.मी.या प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 3000 धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये 1000 ब्लॉईंड फोल्डेड धावपटूंनी देखील सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा मार्ग रवींद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ झाला आणि औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग होता. एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ)चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) पुरूष खुल्या गटात पुण्याच्या अनुराग कोंकर याने 01:24:26सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, अमजद शेख व विश्वास यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटात राधा कौसदीकर हिने 02:02:21 सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर दीप्ती कोलारने दुसरा व ऐश्वर्या हिने तिसरा क्रमांक पटकावला. पुरूष वरिष्ठ गटात दिनेश याने 01:34:37सेकंद वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले. तर महिला गटात तन्मया करमरकर हिने 01:44:16सेकंद वेळ नोंदवत प्रथम स्थान पटकावले.
10 किलोमीटर प्रकारात पुरूष वरिष्ठ गटात सुखदेव सिंगने 46:52सेकंदात अंतर पूर्ण करून विजेतेपद पटकावले. महिला गटात अँजेला पंतने 58:01सेकंद वेळ नोंदवून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व पदके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ आदित्य केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर, रवींद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्सच्या मुख्याध्यापिका जमुना गरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रनबडिज् क्लबचे निखिल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: प्रथम व्दितीय व तृतीय या क्रमानुसार:
10 किलोमीटर:
पुरूष खुला गट:
1. शिखर 34:51से; 2.सारांश रॉय 39:03से, 3.अमित शिवकंद 39:31से;
महिला खुला गट:
1. तान्या दकवर्थ 50:36से, 2.हरिका 51:16से; 3.पूर्वी 51:19से;
पुरूष वरिष्ठ गट:
1.सुखदेव सिंग 46:52से, 2.मोहन बुनिया 47:55से, 3.महादेव घुगे 48:02से;
महिला वरिष्ठ गट:
1.अँजेला पंत 58:01से, 2.मृणालिनी पिंपरीकर 01:03:54से, 3.राधिका श्रीनिवासन 01:06:01से;
अर्धमॅरॅथॉन(21किलोमीटर):
पुरुष खुला गट:
1.अनुराग कोंकर 01:24:26से, 2.अमजद शेख 01:31:24से, 3.विश्वास 01:31:33से;
महिला खुला गट:
1.राधा कौसदीकर 02:02:21से, 2.दीप्ती कोलार 02:03:57से, 3.ऐश्वर्या 02:08:50से;
पुरूष वरिष्ठ गट:
1.दिनेश 01:34:37से, 2.आशिष पुणतांबेकर 01:34:56से, 3.सुभोजीत रॉय 01:36:49से;
महिला वरिष्ठ गट:
1. तन्मया करमरकर 01:44:16से, 2.कविता रेड्डी 01:48:21से, 3.नीला पंचपोर 02:06:27से.