पाकिस्तानमधील कराची आणि इतर भागात काही नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) काल (12 मार्च) पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) उर्वरित सामने रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानातील कराची आणि सिंध प्रांतात कोविड-19चे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यांची संख्या 24 इतकी आहे. त्यामुळे पीसीबीने आजपासून (13 मार्च) उर्वरित सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवले जातील, अशी घोषणा केली. तसेच, खरेदी केलेल्या सर्व तिकिटांचे पैसेही परत दिले जातील असेही सांगितले.
परदेशी खेळाडू मायदेशी परतल्यामुळे त्यांच्या जागी स्थानिक खेळाडूंना संघात स्थान देण्यात येणार आहे. याची घोषणा पाकिस्तानने आज केली. तसेच जे परदेशी खेळाडू उपस्थित आहेत त्यापैकी प्रत्येक संघ जास्तीत जास्त ४ खेळाडूंना संधी देऊ शकतो. तसेच कमीत कमी किती परदेशी खेळाडूंना संघात स्थान द्यायचे याबद्दल कोणताही नियम लावण्यात आला नाही.
१८ मार्च रोजी पीएसएलचा अंतिम सामना होणार असून पुढील ५ दिवसांत साखळी फेरीचे ४ तर सेमीफायनलचे २ व अंतिम सामना असे एकूण ७ सामने खेळवणार आहे.
???? IMPORTANT ANNOUNCEMENT ????
Given the unprecedented situation today PCB has decided that teams will be allowed to bring in local players as replacements for foreign players.
Going forward teams may also play up to 4 foreign players, with no bar on the minimum number.#HBLPSLV
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 13, 2020
पीसीबीचे मुख्य अधिकारी वसीम खान यांनी सांगितले की, “गेल्या 24 तासातील घडामोडींना पाहता पीसीबीने येत्या सामन्यात सहभागी लोकांच्या स्वास्थ्याला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्टेडियममध्ये होणारे सर्व सामने आता प्रेक्षकांविना होणार आहेत.”






