मँचेस्टर| इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सध्या तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज(२८ जुलै) या सामन्यातील पाचव्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने खास कामगिरी केली आहे. त्याने कसोटी कारकिर्दीत ५०० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे.
ब्रॉड कसोटीमध्ये ५०० विकेट्स घेणारा एकूण ७ गोलंदाज ठरला आहे. तर इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचा दुसराच गोलंदाज ठरला.
वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज क्रेग ब्रेथवेट ब्रॉडची ५०० वी विकेट ठरला. विशेष म्हणजे ब्रेथवेट हा अँडरसनचीही ५०० वी विकेट ठरला होता. म्हणजेच २०१७ ला वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत अँडरसनने ब्रेथवेटलाच बाद करत त्याच्या कसोटी कारकिर्दीत ५०० विकेट्स घेण्याचा टप्पा गाठला होता.
त्यामुळे आत्तापर्यंत कसोटी खेळलेल्या ३०१३ खेळाडूंपैकी ब्रेथवेट असा एकमेव खेळाडू आहे जो दोन वेगवेगळ्या गोलंदाजांची ५०० वी विकेट ठरला आहे.
सध्या ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात ब्रेथवेट आज १९ धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे ब्रेथवेट या सामन्यातील पहिल्या डावातही १ धावांवर ब्रॉडच्याच गोलंदाजीवर बाद झाला होता. या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले आहे. परंतु वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ८७ धावांवरच ६ विकेट्स गमावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कोणत्या गोलंदाजाने कोणत्या वर्षात घेतली आपली ५००वी विकेट, वाचा थोडक्यात
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारे ७ गोलंदाज, केवळ एक आहे भारतीय
ट्रेंडिग लेख –
गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
भारतीय संघातील ५ सक्रिय खेळाडू ज्यांनी खेळलाय फक्त एक कसोटी सामना
आश्चर्यकारक! अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २०पेक्षाही कमी धावांवर सर्वबाद झालेत हे २ संघ